Pune Book Festival। पुणे पुस्तक महोत्सवात भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी
६०० पुस्तकांचे स्टॉल, सांस्कृतिक कार्यक्रम, पुणे बाल चित्रपट महोत्सव, विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा, लिट फेस्टीव्हलने पुणे महोत्सव रंगणार - राजेश पांडे
Pune Book Festival । पुणे : भारतीय भाषांमधील पुस्तकांचे ६०० पेक्षा अधिक स्टॉल, ८० पेक्षा अधिक पुस्तकांचे प्रकाशन, लिट फेस्टीव्हल, बाल चित्रपट महोत्सव (Book releases, Lit Festivals, Children’s Film Festivals), शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी यंदाच्या पुणे पुस्तक महोत्सवात नागरिकांना मिळणार आहे. या पुस्तक महोत्सवात पुस्तकांची खरेदी करणाऱ्या नागरिकांना पुस्तकांवर १० टक्के सवलत आहे. त्याचप्रमाणे महोत्सवात होणारे संपूर्ण कार्यक्रम पूर्णपणे मोफत असून, सकाळ ते रात्रीपर्यंत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर रंगणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येनी विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राध्यापक, अभ्यासकांनी हजेरी लावून पुणे शहराला वाचन संस्कृती जपणारे शहर म्हणून ओळख देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे (एनबीटी) संचालक कर्नल युवराज मलिक (निवृत्त) आणि विश्वस्त राजेश पांडे यांनी गुरुवारी दिली. (A feast of events at the Pune Book Festival)
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने आयोजित पत्रकार परिषदेत पुणे पुस्तक महोत्सवाची माहिती देण्यात आली. यावेळी मलिक आणि पांडे बोलत होते. यावेळी पुणे पुस्तक महोत्सवाच्या संयोजन समितीचे सदस्य आनंद कानिटकर, प्रसेनजीत फडणवीस, बागेश्री मंठाळकर, डॉ. संजय चाकणे आदी उपस्थित होते. पुणे पुस्तक महोत्सवाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि पुणे महापालिकेचे (Savitribai Phule Pune University, Deccan Education Society, Pune Municipal Corporation) सहकार्य लाभले आहे.यंदा पुस्तकांच्या दालनांसोबत दमदार सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमांची मेजवानी राहणार आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले असल्याने, यंदाचा पुस्तक महोत्सव खऱ्या अर्थाने वेगळा ठरणार आहे, असे मलिक यांनी सांगितले.
Related Posts
पुणे पुस्तक महोत्सव फर्ग्युसन महाविद्यालयाच्या (Ferguson College) मैदानावर येत्या १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत होईल. महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या शनिवारी १४ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता होईल. पुस्तकांची दालने सकाळी १० ते रात्री १० या वेळेत कार्यरत असतील. शालेय विद्यार्थ्यांसाठी १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत दररोज सकाळी आणि दुपारच्या सत्रात कथा लिहिणे, चित्रकला, नृत्य, संगीत, वेदिक गणित अशा विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळा पूर्णपणे मोफत असून, त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. त्याचप्रमाणे १४ ते १८ डिसेंबर या कालावधीत दुपारी १२ ते ४ या वेळेत पुणे बाल चित्रपट महोत्सव होणार आहे. त्यामध्येही मुलांना सहभागी होता येईल. हा उपक्रमही पूर्णपणे मोफत राहणार आहे, असे युवराज मलिक यांनी सांगितले.
पुणे पुस्तक महोत्सवात यंदा २० ते २२ डिसेंबर या कालावधीत लिट फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टीव्हलमध्ये साधारण २५ पेक्षा अधिक सत्र विविध विषयांवर होणार असून, त्यामध्ये ६० पेक्षा अधिक साहित्यिक, लेखक, विचारवंत, पत्रकार, कवी सहभागी होणार आहे. हे कार्यक्रम फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँम्फी थिएटरमध्ये होणार असून, पूर्णपणे मोफत राहणार आहेत. पुणे पुस्तक महोत्सवातील कार्यक्रम, कार्यशाळा, उपक्रम यांचे वेळापत्रक एनबीटीच्या वेबसाइटवर; तसेच पुणे पुस्तक महोत्सवाचे क्यूआर कोड स्कॅन असे युवराज मलिक यांनी सांगितले.
आज विश्वविक्रम होणार
पुणे पुस्तक महोत्सवात दहा हजार पुस्तकांच्या सहाय्याने सरस्वती यंत्राचे सुंदर चित्र तयार करण्याचा विश्वविक्रम दुपारी चार वाजता करण्यात येणार आहे. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती निलम गोऱ्हे, आमदार चित्रा वाघ, माधुरी मिसाळ, रतन टाटा राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर (Deputy Chairman of the Legislative Council Neelam Gorhe, MLAs Chitra Wagh, Madhuri Misal, Vice Chancellor of Ratan Tata State Skills University Dr. Apurva Palkar) प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राजेश पांडे यांनी दिली.
पुणे पुस्तक महोत्सवाला यंदा राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले असून, त्याला आता आंतरराष्ट्रीय करण्यासाठी आपल्या सर्वांनी प्रयत्न करायला हवा. यंदाच्या महोत्सवात सर्व भाषांमधील सुमारे विविध भाषेतील साधारण ८० पेक्षा अधिक पुस्तकांचे प्रकाशन होणार आहेत. या महोत्सवात नागरिकांना लेखक, साहित्यिक, विचारवंत, कवी, पत्रकार यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी पुणे पुस्तक महोत्सवाला भेट देऊन, वाचन संस्कृतीला पाठिंबा बळकट करावे.– राजेश पांडे, मुख्य संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव
पुणे पुस्तक महोत्सवातील आकर्षण
– प्रसिद्ध लेखक शिव खेरा यांचे व्याख्यान
– नीती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांचे मार्गदर्शन
– अभंग रीपोस्ट, युग्म, हरगुन कौर आणि साधो अशा प्रसिद्ध बँडचे सादरीकरण
– ट्रेनिंग द ट्रेनर्स हा उपक्रम दररोज
– उद्योगपती गोविंद ढोलकीया यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान
– दीपा किरन – द आर्ट ऑफ स्टोरी टेलिंग
– हिरू भोजवानी – बेस्ट प्रॅक्टिसेस इन लायब्ररी
– विवेक कुमार – टीचिंग क्विक कॅलक्युलेशंस थ्रू वेदिक मॅथेमॅटीक्स