...

Aadhaar Card Update : आधार कार्ड अपडेट लगेच करा ; उरले फक्त दोन दिवस

Aadhaar Card Updateबारा अंक असलेले आधार कार्ड ही आपल्या देशातील सर्वांची ओळख आहे. आपल बँक खाते उघडायचे असेल किंवा टॅक्स फाईल करायचे असेल अथवा कुठल्याही सरकारी कामासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. मात्र, सुरुवातीला माहिती सांगताना आणि अनेकांच्या चुका झाल्या आहेत. तसेच नाव, पत्ता, पिन कोडमध्ये चुक झाली आहे. त्या दुरुस्त करुन घेणे आवश्यक आहे. (Aadhaar Card Update : Update Aadhaar Card Immediately)

 

Pune Book Festival । साहित्याची भूक भागविणारा अप्पा बळवंत चौक ही वाचणार पुस्तक

आधार कार्डमध्ये मोफत अपडेट करण्यासाठी सरकराच्या वतीने तीन वेळा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. पहिल्यांदा मार्च ते जून, नंतर हीच मुदत सप्टेंबरपर्यंत वाढवली. पुढे आणखी वेळ देत १४ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली होती. जर तुमच्या आधार कार्डमध्ये नाव, फोन नंबर किंवा नावात काहीतरी चूक झालेली असेल तर तुम्ही आधार कार्डमध्ये बदल करु शकता. यासाठी तुम्हाला कुठलेही शुल्क द्यावे लागणार नाहीत. जर तुम्हाला बायोमेट्रिकशी संबंधित कोणती माहिती अपडेट करायची असेल तर तुम्हाला अधिकृत केंद्रावर जावे लागेल. 

 

सुरुवातीला myaadhaar.uidai.gov.in वर जायेथे तुमचा आधार नंबर टाकून मोबाईवर ओटीपी येईल. ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला ओळखीचे पुरावे अपलोड करावे लागतील अर्ज सबमीट केल्यानंतर तुम्हाला एक सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर मिळेल, त्यावरुन अर्जाचे स्टेटस चेक करता येईल. भारतामध्ये असे अनेक लोक आहेत, ज्यांना आपल्या आधार कार्डच्या माहितीमध्ये बदल करायचा आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून आधार कार्डमध्ये बदल करण्यासाठी मोफत सुविधा देण्यात आलेली आहे. त्यासाठी १४ डिसेंबर २०२४ पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे.

 

 

आधार अपडेट करण्याची काय गरज? – What is the need to update Aadhaar?

जर तुमचं आधार कार्ड तयार होऊन १० वर्षे झालेली असतील तर ते अपडेट करुन घ्यावे.जर तुमच्या डोळ्यांची सर्जरी झालेली असेल किंवा काही अपघात झाला असेल आणि त्यामुळे हातांच्या ठशांमध्ये बदल झालेले असतील तर फिंगर प्रिंट नक्की अपेडट करावेत. आधार कार्ड व्हेरिफाय करताना सातत्याने फेल दाखवत असेल तर तुम्ही नक्कीच आधार कार्ड बदलणे आवश्यक आहे. ज्या मुलांना १५ वर्षे पूर्ण झालेली आहेत, त्यांनाही आपले आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे

Local ad 1