पुणे : रेल्वे प्रशासनाने गेली आठ महिन्यांच्या कालावधीत पुणे विभागात तब्बल 2 लाख 32 हजार 193 फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून 13 कोटी 34 लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. (Railways hit two and a half lakh casual passengers!)
जल, जंगल, जमिनीसाठी भारतीय जैन संघटनेने योगदान द्यावे : शरद पवार
रेल्वेकडून सातत्याने फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी तिकीट तपासणीस, रेल्वे सुरक्षा बल यांच्या माध्यमातून मोहिम हाती घेण्यात येते. तसेच, दररोज तिकीट तपासणी देखील करण्यात येते. यामार्फत दि. 1 एप्रिल ते 1 डिसेंबर या कालावधीत रेल्वेच्या पुणे विभागाने तब्बल 2 लाख 32 हजार 193 फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून 13 कोटी 34 लाख रूपयांचा दंड वसूल केल्याचे समोर आले आहे. यात अनियमित तिकीट प्रवासी, विना तिकीट प्रवासी आणि सामान (लगेज) बुक न करता घेऊन जाणार्या प्रवाशांवर ही कारवाई करण्यात आली आहे.