(Deepali Chavan suicide case) रेड्डी यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करा ः चित्रा वाघ
मुंबई : महिला वन अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येला जबाबदार धरुन अपर मुख्य प्रधान वन सरंक्षक रेड्डी यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली. (Deepali Chavan suicide case)
या प्रकरणाचा तपास अमरावतीच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून काढून घेऊन अन्य निःष्पक्ष अधिकाऱ्याकडे सोपवावा, अशी मागणीही त्यांनी केली. रविवारी (28 मार्च) पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. (Deepali Chavan suicide case)
चित्रा वाघ म्हणाल्या, “दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस शिवकुमार एकटा जबाबदार नाही. दीपालीच्या तक्रारीची दखल न घेता शिवकुमारला वेळोवेळी पाठिशी घालणारे रेड्डी हे सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. मात्र, सरकारने रेड्डी यांची बदली करून त्यांना अभय दिले आहे. दीपाली चव्हाण यांची या व्यवस्थेने हत्या केली आहे. आता शिवकुमार यांना वाचविण्याचे प्रयत्न पोलीस यंत्रणेकडून सुरु झाले आहेत. त्यामुळे त्यांनाही सेवेतून निलंबित करून अटक करावी.” अशी मागणी केली. (Deepali Chavan suicide case)
पुन्हा संजय राठोड चर्चेत..
दीपाली चव्हाण यांनी खासदार नवनीत राणा यांच्याशी संपर्क साधला होता तेव्हा त्यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेत रेड्डी यांच्याशी संपर्क साधला. तसेच शिवकुमार यांच्याबद्दलच्या दीपाली चव्हाणच्या तक्रारी सांगितल्या होत्या. नवनीत राणा यांनी या संदर्भात तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांनाही पत्र पाठवले होते. मात्र राणा यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केली. (Deepali Chavan suicide case)