पुणे. मुस्लिम समाजातील (Muslim community) सक्रीय राजकीय कार्यकर्त्यांचे न भरून येणारे नुकसान लोकसभा पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत होत आहे. मुस्लिम समाजाशी संबंधित प्रलंबीत प्रश्न व भविष्यातील योजनांबाबत कोणतीही चर्चा न करता थेट पाठींबा दिला जात असल्याने राजकीय कार्यकर्त्यांना गृहीत धरुन संपुर्ण राजकारण सुरु आहे. समाजातील राजकीय कार्यकर्त्यांची कोंडी ही त्या समाजाला दहा वर्ष मागे नेणारी असल्याने याबाबत चिंता वाटत आहे. (Does the Muslim political movement suffer?)
अराजकीय लोक निवडणुकांनंतर त्यांचे कामकाजात व्यस्त होतात व सामाजिक व अन्य राजकीय मुद्द्यांवर काम करताना सक्रीय राजकीय कार्यकर्त्यांना काम करताना येणार्या अडचणींना एकाकी तोंड द्यावे लागते. राजकीय कार्यकर्त्यांनी अद्याप वेळ न दवडता संधी साधत प्रलंबीत प्रश्नांवर महाविकास आघाडीला बोलते करायला हवे. शनिवारी 16 नोव्हेंबर रोजी सायं 4 वा , ढोले पाटील रोड येथे राजकीय कार्यकर्त्यांची अत्यंत महत्वपुर्ण बैठक आयोजित केली आहे. त्यात मंथन केले जाणार आहे, अशी माहिती नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे (National Conference for Minority President Rahul Dumbale) यांनी दिली आहे.
अल्पसंख्याकांच्या विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध – खा. इम्रान प्रतापगडी