पुणे : गेल्या विधानसभा निवडणुकीत कमी फरकाने विजयी झालो आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत केलेल्या विविध विकास कामे, कोरोना काळात केलेली सेवा आणि बेरोजगार युवक-युवतींना रोजगार देण्यासाठी नोकरी महोत्सवातून पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील नागरिकांची सेवा केली आहे. त्यामुळे मतदार मला आपले मतदान रुपी अशिर्वाद देऊन मला विजयी करतील. यंदाची निवडणूक ही 50 हजारांच्या मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वास आमदार सुनील कांबळे यांनी व्यक्त केला आहे. (Will win with 50 thousand votes – MLA Sunil Kamble)
पुणे कॅन्टोन्मेंंटमध्ये आमदार सुनील कांबळे मतदारांशी साधतायेत संवाद
याप्रसंगी बोलताना आमदार सुनील कांबळे म्हणाले, ‘विकासाच्या मुद्द्यावर जनते समोर जात आहे आणि याच मुद्द्यावर नागरिक मला पुन्हा संधी देतील. मागच्या निवडणुकीला मला मताधिक्य कमी होतं. पण यावेळी ५० हजार मतांचे लीड मला मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
आरपीआयची पूर्ण ताकद आमदार सुनील कांबळे यांच्या पाठीमागे उभी करु – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
दरम्यान, सुनील कांबळे यांच्या प्रचारार्थ काल प्रभाग १६ व १७ भागातील निवडुंग विठोबा मंदिर आझाद आळी येथून विठू माऊलीचे आशीर्वाद घेऊन भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेसाठी भाजपा, राष्ट्रवादी,शिवसेना,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) आणि सर्व मित्रपक्षाचे कॅन्टोन्मेंट चे पदाधिकारी कॅन्टोन्मेंट चे भाजपाचे पुणे मनपा चे माजी सभागृह नेते गणेश बिडकर,दक्षिण कन्नडा चे भाजपा खासदार कॅप्टन ब्रिजेश चौटा, राष्ट्रवादीचे असंघटित केमिस्ट आघाडीचे अध्यक्ष विनोद काळोखे, नेते सागर पवार, कॅन्टोन्मेंट भाजपाचे दिलीप मामा बहिरट, पुरूषोत्तम पिल्ले आण्णा, मांगीलाल शर्मा आदींसह महायुती मधील मित्रपक्षांचे नेते, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.