शिवसेना उमेदवार विजय शिवतारेंनी आचार संहितेचा भंग केल्याची तक्रार
कारवाई करण्याची युवक काँग्रेसच्या रोहन सुरवसे पाटील यांची मागणी
पुणे : पुरंदर विधानसभा शिवसेना महायुतीचे उमेदवार, माजी मंत्री विजय शिवतारे (Former Minister Vijay Shivtare) यांनी निवडणूक प्रचारासाठी ‘एअर बलून’ लावून आचार संहितेचा भंग केल्याचे प्रकरण समोर आले आहे. शिवतारे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील (Maharashtra Pradesh Youth Congress General Secretary Rohan Suravse-Patil) यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे (District Election Officer Dr. Suhas Diwase) तसेच निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम (Resident Deputy Collector Jyoti Kadam) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी युवक काँग्रेसचे पदाधिकारी अक्षय सागर, सागर घाडगे, ज्ञानेश्वर जाधव हे उपस्थित होते. (Complaint that Shiv Sena candidate Vijay Shivtare violated the code of conduct)
महायुतीचे सरकार हे कँटोन्मेंटच्या विकासातील अडसर : काँग्रेस उमेदवार रमेश बागवे यांची टिका
फुरसुंगी येथील ‘रॉयल स्टे ईन लॉजिंग’ या लॉजवर शिवतारे यांनी निवडणूक प्रचारासाठी हवेत ‘एअर बलून’ बांधला आहे. ज्यावर शिवसेना पक्ष चिन्ह धनुष्यबाण तसेच विजय शिवतारे शिवतारे यांच्या संदर्भातील प्रचाराचा मजकूर आहे. आचारसंहितेच्या काळात निवडणूक प्रचाराच्या उद्देशाने बॅनर अथवा होर्डिंग लावण्यास राजकीय पक्षांना तसेच उमेदवारांना प्रतिबंध आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाची दमदार कामगिरी ; ८४३ व्यक्तींना अटक
विजय शिवतारे यांनी लावलेल्या एअर बलूनचे व्हिडीओ तसेच फोटोही सुरवसे पाटील यांनी प्रसारित केले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे असल्याचेही सुरवसे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे निवडणूक आयोग महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांच्यावर कारवाई करणार का असा सवाल उपस्थित होत आहे.
पुण्यात रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी महायुतीला मतदान न करण्याची घेतली प्रतिज्ञा !