(deputy Chief Minister ajit pawar) महाविकास आघाडीत कोणी मिठाचा खडा टाकू नये
बारामती : गृहमंत्री अनिल देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यावर सामनातून खासदार संजय राऊत यांनी देशमुख यांना गृहमंत्रीपद कोणी स्विकारले नाही, म्हणून मिळाले. यासह त्यांच्या कामकाजावरही मत व्यक्त केले आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. रविवारी ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. (deputy Chief Minister ajit pawar)
राज्यातील महाविकास आघाडी सरकार तीन पक्षांचे असून,कोणाला मंत्री करायचे हे अधिकारी पक्ष प्रमुखांना आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत कोणी मिठाचा खडा टाकू नये, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडे बोल खा. राऊत यांना सुनावले आहेत. (deputy Chief Minister ajit pawar)
रोखठोक मधून राऊत यांनी इतरानी गृहमंत्री पद नाकारल्याने देशमुख यांच्याकडे हे पद अपघाताने आल्याचे म्हटले होते. यावर पवार यांनी संजय राऊत यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. हे तीन पक्षांचे सरकार असून, कुणाला मंत्री करायचे हा तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना अधिकार आहे. राष्ट्रवादीत कोणाला मंत्री करायचे हा शरद पवार यांचा अधिकार आहे. हे तीन पक्षाचं सरकार असताना या पक्षांशी संबंधित व्यक्तींनी एकमेकांना वक्तव्य करुन अडचणी निर्माण करुनयेत. शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री कोण असावेत, मंत्री कोण असावेत हे ठरवले आहे. त्यामुळे महाविकासआघाडी एकत्रित काम करत असताना कुणीही त्यात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करु नये, असे अजित पवार यांनी सांगितले. (deputy Chief Minister ajit pawar)