Maharashtra Assembly Elections । विधानसभा निवडणुकी संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी केली मोठी घोषणा !
कोणत्या मतदारसंघात असणार उमेदवार ; कोणाला पाडायचे हेही ठरले !
Maharashtra Assembly Elections जालना । मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार कोण – कोणत्या विधानसभा मतदार संघात असणार आहेत. याची घोषणा केली आहे. त्यात सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections) २० ते ३० जागांवर उमेदवार देऊ अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. त्यानंतर आता त्यांनी राज्यातील २५ जागा निश्चित केल्या आहेत. या २५ जागांवर ते त्यांचे उमेदवार जाहीर करणार आहेत. त्यापैकी १५ मतदारसंघांची त्यांनी रविवारी (३ नोव्हेंबर) रात्री घोषणा केली. मनोज जरांगे आज सोमवारी या १५ जागांवर त्यांचे उमेदवार जाहीर करतील, असे सांगण्यात आले आहे. (Manoj Jarange Patil made a big announcement regarding the assembly elections)
बीड, केज, परतूर या विधानसभा मतदारसंघांसह १५ जागांवरील उमेदवारांची घोषणा केली जाईल असं मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी आंतरवाली सराटी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेद्वारे जाहीर केले. २५ मतदारसंघांबाबत चर्चा झाल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. मनोज जरांगे पाटील म्हणाले, आम्ही बीडची विधानसभा निवडणूक लढवायचे ठरले आहे. तसेच मंठा व परतूरमध्ये ही आमचे उमेदवार असतील. फुलंब्रीसह सध्या १५ मतदारसंघ आम्ही निश्चित केले आहेत. जिथे आमचे उमेदवार नसतील तिथे आम्ही मराठा आरक्षणात अडथळा निर्माण करणाऱ्यांना पाडायचे ठरवले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अर्ज मागे घ्यायच्या काही तास आधी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्या जागांवर उमेदावर उतरवणार आणि कुठे उमेदवार पाडणार, याची घोषणाच मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मनोज जरांगेंनी जाहीर केलेल्या ठिकाणी प्रमुख राजकीय पक्षांचे आमदार आहेत. ज्या तीन जागांवर मनोज जरांगे उमेदवार पाडणार, असे म्हणत आहे तिथल्या तीनही जागांवर सध्या महायुतीचे आमदार आहेत. तर ज्या जागांवर मनोज जरांगेंनी उमेदवार दिले आहेत त्यातल्या 13 पैकी 7 जागांवर सध्या भाजपचे आमदार आहेत, तर दोन ठिकाणी शिवसेनेचे, दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि दोन ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत.
जरांगे लढणार तिथे कुणाचे आमदार?
बीड – संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी
केज – नमिता मुंदडा, भाजप
परतूर मंठा – बबनराव लोणीकर, भाजप
फुलंब्री – हरीभाऊ बागडे, भाजप
कन्नड – उदयसिंग राजपूत, शिवसेना
वसमत – चंद्रकांत नवघरे, राष्ट्रवादी काँग्रेस
हिंगोली – तानाजी मुटकुळे, भाजप
पाथरी – सुरेश वरपुडकर, काँग्रेस
हदगाव – माधवराव पवार, काँग्रेस
धाराशीव – कैलास पाटील, शिवसेना
दौंड – राहुल कुल, भाजप
पर्वती – माधुरी मिसाळ, भाजप
शेवगाव पाथर्डी – मोनिका राजळे, भाजप
निलंगा – लातूर संभाजी पाटील निलगेंकर