नांदेड जिल्ह्यातील 21 अपक्ष उमेदवारांची निवडणुकीतून माघार ; ४ नोव्हेंबरला ३ वाजेपर्यंत अर्ज माघार घेता येईल

नांदेड : नांदेड विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदार संघ आहेत. त्यातील भोकर, नायगाव आणि लोहा विधानसभा मतदार संघातील 21 अपक्ष उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज 31 ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्यात आले. अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये एकापेक्षा अधिक अर्ज दाखल करणारे उमेदवार तसेच अपक्ष उमेदवारांचाही समावेश आहे. (21 independent candidates withdraw from assembly elections)

 

 

पुण्यात बारा तासांत 35 ठिकाणी आगीच्या घटना ; कुठे घडल्या घटना जाणून घ्या..

85 – भोकर विधानसभा मतदार संघातील सर्वाधिक 17 उमेदवारांनी अर्ज माघार घेतली आहे. त्यामध्ये अमिता अशोकराव चव्हाण (Amita Ashokrao Chavan) – अपक्ष, अलताफ अहमद इक्बाल अहेमद-अपक्ष, अशफाक अहमद गुलाम हबीब-अपक्ष, आनंदा नागन नागलवाड-अपक्ष, उषाताई आकाश भालेराव-अपक्ष, खान अलायार-अपक्ष, चंद्रप्रकाश तुळशीराम सांगवीकर-अपक्ष, जुल्फे खान जिलानी सय्यद-अपक्ष, तुकाराम गणपत बिराजदार-अपक्ष, प्रमोद किशनराव कामठेकर-अपक्ष, बालाजी कुलकर्णी-अपक्ष, ॲड. मारोतराव कान्होबाराव हुक्के पाटील-अपक्ष, विजयमाला गजानन गायकवाड-अपक्ष, वैशाली मारोतराव हुक्के पाटील-अपक्ष, शिवशंकर बालाजी बडवणे-अपक्ष, सलीम अहमद अब्दुल कादर-अपक्ष, संजय शंकरराव घोरपडे-अपक्ष या 17 उमेदवारांनी आज आपली उमेदवारी मागे घेतली. (21 independent candidates withdraw from assembly elections)

 

E-KYC Ration Card। रेशनकार्ड  KYC करण्यासाठी मिळाली ‘ईतक्या’ दिवसांची मुदतवाढ

89-नायगाव :  प्रतिक्षा भगवानराव मनूरकर-अपक्ष, प्रभावती भगवानराव मनूरकर-अपक्ष या 2 उमेदवारांनी आज आपली उमेदवारी मागे घेतली. (21 independent candidates withdraw from assembly elections)

88-लोहा : प्रतापराव गोविंदराव पाटील (Prataprao Govindrao Patil) -अपक्ष, श्यामसुंदर दगडोजी शिंदे (Shyamsundar Dagdoji Shinde) -अपक्ष या 2 उमेदवारांनी 31 ऑक्टोबर रोजी आपली उमेदवारी मागे घेतली. (21 independent candidates withdraw from assembly elections)
Local ad 1