(MP Imtiaz Jalil Aurangabad district) आधी आरोग्य विभागातील रिक्त जागा भरा ः खा. इम्तियाज जलील
औरंगाबाद : कोरोनाला रोखण्यासाठी औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने 30 एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन (lockdown) घोषित केला आहे. मात्र, हा निर्णय घेताना लोकप्रतिनिधिंना विश्वासात घेतले नाही. प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयाला AIMIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शवला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यापेक्षा आरोग्य विभागातील रिक्त असलेल्या जागा भरा, या मागणीसाठी आंदोलनाच इशारा खासदार जलील यांनी दिला आहे. (MP Imtiaz Jalil Aurangabad district)
औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयाविरोधात इम्तियाज जलील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 31 मार्च रोजी लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याची जलील यांनी फेसबुक लाव्हाईद्वारे दिली आहे. या आंदोलनात वैद्यकीय विभागात तातडीने भरती करण्यात यावी अशी मागणी केली. त्यात त्यांनी घाटी, कॅन्सर रुग्णालय आणि जिल्हातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातील रिक्त असलेल्या पादांची माहिती दिली. रिक्त असलेल्या पदे भरल्यास आरोग्यसेवा चांगली मिळण्यास मदत होईल, असे खा. जलील म्हणाले. (MP Imtiaz Jalil Aurangabad district)
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं 30 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्याला जलील यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या लाॅकडाऊनमधुन उद्याोग क्षेत्राला वगळण्यात आले. मात्र, त्याठिकाणी सुमारे दोन लाख कामगार काम करतात. मग त्यांच्या आरोग्याची चिंता का करण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. (MP Imtiaz Jalil Aurangabad district)
औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शनिवारी लॉकडाऊनबाबतचे आदेश जारी केले. लॉकडाऊन दरम्यान किराणा दुकाने सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत, तर दूध विक्री आणि भाजीपाल्याची विक्री सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंतच सुरु राहणार आहे. महत्वाची बाब म्हणजे लॉकडाऊनमधून उद्योग श्रेत्राला वगळण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यात आला पण रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. (MP Imtiaz Jalil Aurangabad district)