माजी खासदार चिखलीकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर

नांदेड । लोहा विधानसभा मतदार संघातून महायुतीचा उमेदवार कोण असणार देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असून, लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नसल्याचे  त्यांनी स्पष्ट  केले होते. त्यामुळे लोहा विधानसभा मतदार संघ महायुतीमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे) की राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार) पक्षाला सुटणार याकडे लक्ष लागले होते. अखेर लोहा विधानसभेसाठी महायुतीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याल गेला असून, भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर घड्याळ चिंन्हावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेसने जाहिर केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये त्यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे.  महाविकास आघाडीमध्ये हा मतदार संघ शिवसेना (उबाठा) यांच्या वाट्याला गेला असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी स्थायी समितीचे आध्यक्ष एकनाथ पवार यांना उमेगदवारी जाहिर करण्यात आली आहे. त्यामुळे चिखलीकर विरुद्ध पवार असा सामना लोह्यात रंगणार आहे.  (Former MP Chikhlikar has been nominated by NCP)

 

 

( बातमी अपड़ेट होत आहे))

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 44 उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर 

 

राष्ट्रवादी काँग्रेसने जाहिर केलेली उमेदवांरीची यादी

 

Former MP Chikhlikar has been nominated by NCP

 

 

शिवसेनेने जाहीर केलेले 45 उमेदवार कोण आहेत?

Local ad 1