Diwali snacks । आमदार रविंद्र धंगेकर मतदारांना दिवाळी फराळाचे वाटप करुन प्रभोलन दाखवत असल्याचा भाजप कार्यकर्त्यांचा आरोप
Diwali snacks पुणे : पुण्यातील कॉंग्रेसचे कसबा पेठचे आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे मतदारांना दिवाळी फराळाचे वाटप करुन प्रलोभीत करत आहेत असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. रविंद्र धंगेकरांकडून वाटप करण्यासाठी निघालेला दिवाळी फराळाचा (Diwali snacks) टेम्पो भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांनी समर्थ पोलीस (Samarth Police Station) ठाण्यात हा फराळाचा टेम्पो नेण्यात आला आहे. याप्रकरणी भाजपकडून धंगेकरांच्या विरोधात पोलीसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. (BJP workers allege that MLA Ravindra Dhangekar is showing probholan by distributing Diwali snacks to voters.)
भाजपने तक्रार केल्यानंतर आमदार रविंद्र धंगेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. रविंद्र धंगेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात येईल असं पोलीस उपायुक्त संदीप गील यांनी स्पष्ट केले आहे. रविंद्र धंगेकर हे कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मार्च 2023 ला झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी ही जागा जिंकली होती. जी भाजपच्या विद्यमान आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती.
माझा विजय पक्का असल्याने विरोधकांचे कारस्तान
नागरिकांच्या दिवाळीत सहभागी व्हावे म्हणून दरवर्षी माझा मित्रपरिवार ‘आनंदाची दिवाळी’ नागरिकांना भेट म्हणून देतो. त्याप्रमाणे यंदाही ‘आनंदाची दिवाळी’ माझा मित्रपरिवार देत असावा. सर्वांच्या आनंदात सहभागी होणे, या भावनेने मित्रपरिवार दरवर्षी हा उपक्रम घेतो. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम 15 ऑक्टोबर, 2024 रोजी घोषित केला आहे. याची मला पूर्ण जाणीव आहे. कुठल्याही प्रकारच्या वस्तूचे वाटप करण्यात माझा व्यक्तीश: सहभाग नाही, हे मी स्पष्ट करू इच्छितो. मी अजून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो नाही. तरीपण माझा विजय पक्का असल्याने विरोधकांच्या छातीत आत्तापासूनच धडकी भरल्याचे चित्र स्पष्ट जाणवत आहे.
आनंदा शिधा वाटपाच्या बॅगवर कोणाचे फोटो आहेत ?
राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्र असलेल्या पिशव्यांमधून विविध वस्तूंचे वाटप पुण्यात सुरू आहे. त्यांनी जरूर वाटप करावे. पण जर माझा मित्र परिवार ‘आनंदाची दिवाळी’ वाटप करतोय म्हणून त्यांना रोखत असाल तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्र असलेल्या पिशव्यांमधून होणाऱ्या वस्तूंचे वाटप कोण रोखणार ? माझ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावरही नक्कीच होवू शकतो.