– प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा शिवसेना युतीने विधानसभा निवडणुकीत १६१ जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळविले.
– भाजपाला निवडणूक जिंकूनही विरोधी पक्ष म्हणून काम करावे लागल्यानंतर अडीच वर्षांत भाजपाने सातत्याने जनतेच्या विविध प्रश्नांवर आंदोलने करून राज्य सरकारवर दबाव आणला.
– पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जिंकली. राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीत भाजपाला यश.
– जिल्हा परिषद निवडणुका, नगरपालिका निवडणुका व ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये भाजपा पहिल्या क्रमांकावर.
– पक्ष संघटनेचा विस्तार.
– राज्यातील सुमारे एक लाख बूथ पैकी बहुतेक बूथमध्ये भाजपाची ताकद निर्माण झाली.
– कोरोनाच्या संकटात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जनतेसाठी प्रभावी सेवा कार्य केले व त्याचे कौतुक मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
– संघटन सेवा संघर्ष या तीनही बाबतीत पक्षाने चांगली कामगिरी केली.
– ३० जून २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर.
– एकनाथजर्जीच्या मंत्रिमंडळात उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री पदाची जबाबदारी
– 4 ऑक्टोबरला २०२३ पासून सोलापूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री
१) मुलींना मोफत व्यावसायिक उच्च शिक्षण देण्याचा निर्णय.
Related Posts
२) नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यास प्राधान्य दिले.
राज्यात वस्त्रोद्योग धोरण लागू करण्यासाठी योगदान.
२०१४ ते २०१९ महसूल, सार्वजनिक बांधकाम, सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग, मदत आणि पुनर्वसन, कृषी व फलोत्पादन या खात्यांची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. मंत्रिपदाच्या काळात मराठा आरक्षणासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी होती. मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखानी मराठा आरक्षणाचा कायदा करून अंमलबजावणी करण्यात यश मिळाले. मराठा समाजासाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली. ८ ऑगस्ट २०२२ पासून राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य विभागाची जबाबदारी.
जुलै २०१६ ते ऑक्टोबर २०१९ विधान परिषद सभागृह नेता म्हणून जबाबदारी. २००८ साली पुणे पदवीधर मतदारसंघातून विधान परिषद सदस्य म्हणून निवड, २०१४ साली पुणे पदवीधर मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवड. २०१९ साली कोथरूड, पुणे विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवड. पाच वर्षात कोथरुड मध्ये विविध सेवा उपक्रमाच्या माध्यमातून व्यापक जनसंपर्क.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे समर्पित कार्यकर्ता. वयाच्या २१ व्या वर्षी अभाविपचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम सुरू केले. महाराष्ट्र संघटन महामंत्री आणि राष्ट्रीय महासचिव पदांवर काम केले. १९८० ते १९९४ ऐन तारुण्यात संघटनेसाठी पूर्णवेळ संपूर्ण समर्पणाने काम. त्यानंतर १९९५- १९९९ या कालावधीत रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहकार्यवाह म्हणून तर सन १९९९-२००४ या कालावधीत पश्चिम महाराष्ट्रात रा. स्व. संघाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सेवा कार्यात योगदान.
अतिशय सामान्य कुटुंबातून आले. सर्वसामान्यांच्या दुःखाची जाणीव आहे. स्वतः पुढाकार घेऊन सामाजिक कार्य चालू. कोल्हापुरात पाच रुपयात पोळी भाजी देणारे संवेदना फाउंडेशन, आर्थिकदृष्ट्या वंचित मुलांसाठी अध्ययनक्षमता वाढविणारे खेळघर, दारवाड व खानापूर ही दोन गावे दत्तक घेऊन आदर्श ग्राम योजनेची अंमलबजावणी, विविध आजारांनी अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांसाठी सावली केअर सेंटर अशा संस्था स्थापन करून कार्य.
https://www.mhtimes.in Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.