Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्य सरकार आणि निवडणूक आयोगावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे गंभीर आरोप

विधानसभा मतदार संघातील 10 ते 15 हजार मतदार कमी केले जातायत  

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यातील काही मतदारसंघातील दहा ते 15 हजार मते काढून टाकून त्या ठिकाणी बोगस मतदान मतदार नोंदणी एका ॲपच्या माध्यमातून  होत आहे, असा गंभीर आरोप महाविकास आघाडीने केला आहे. हे कटकारस्थान करणारे सूत्रधार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrasekhar Bawankule)आहेत, असा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut)यांनी केला आहे.  ज्या मतदारसंघांमध्ये मतदार यादीमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, ते मतदारसंघ महाविकास आघाडीच्या नेत्यांनी समोर आणल्याचा दावा केला आहे. जर हा प्रकार थांबला नाही तर आम्ही या विरोधात मोर्चा काढू असा इशारा सुद्धा महाविकास आघाडीने दिला आहे.  (Mahavikas Aghadi leaders make serious allegations against the state government and the Election Commission)

 

हडपसर विधानसभा मतदार संघातून रशिद शेख यांना उमेदवारी द्या ; मुस्लिम समाजाची मागणी

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मतदार यादींमध्ये होत असलेल्या गोंधळाविरोधात निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती. या संदर्भाने शनिवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मतदार यादीमध्ये कशा पद्धतीने गोंधळ घातला जात आहे, या संदर्भातील माहिती दिली. खासदार संजय राऊत म्हणाले की, महायुतीवाल्यांना आम्ही लफंगे म्हणतो. एक प्रकारे ते पराभवाला घाबरले असल्याने लोकशाही विरोधात मोठे कट कारस्थान केले जात आहे. त्या अनुषंगानेच आम्ही  निवडणूक आयोगाला भेटलो होतो, असे संजय राऊत यांनी सांगितले. शिर्डी, चंद्रपूर, आर्वी, कामठी, कोथरूड, गोंदिया, अकोला ईस्ट, चिखली, नागपूर, कणकवली, खामगाव, चिमूर आणि धामणगाव या मतदारसंघात मतदार यादीत गोंधळ असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे.

 

निवडणूक आयोगावर नाना पटोलेंचा हल्लाबोल

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole)म्हणाले की, आम्ही या मतदार यादीबद्दल राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. निवडणूक पारदर्शक पद्धतीने व्हावी, अशी मागणी आहे. मात्र, राज्यातील निवडणूक पारदर्शकपणे होत नाही, हे वास्तव आहे  निवडणूक आयोग हा मोदींच्या पायाशी बसला आहे का? अशी विचारणा सुद्धा नाना पटोले यांनी केली.

एका दिवसात 2844 मतदार कसे वाढतात?

नाना पटोले म्हणाले, शिर्डी मधील लोणी गावांमध्ये 2844 मते लोकसभेनंतर वाढवण्यात आली आहेत. तर मुसलमान, बौद्ध यांची मत कमी करण्याचा प्रयत्न होत आहे मतदार म्हणून तुम्ही सतर्क झाला पाहिजे. आपले नाव मतदार यादीत बरोबर आहे की नाही, हे तपासले पाहिजे. निवडणूक आयोगामधील काही अधिकारी भाजपच्या आदेशाने काम करत आहेत, असा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केला. दहा ते पंधरा हजार मतदारांची नावे कमी करण्याचा प्रयत्न होत आहे आणि त्यात बदल्यामध्ये बाहेरील राज्यातील मतदार या वाढवले जात आहेत. एका दिवसात 2844 मतदार कसे वाढतात? अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली. (Mahavikas Aghadi leaders make serious allegations against)

 

निवडणूक आयोग सरकारची कठपुतळी

जितेंद्र आव्हाड म्हणाले की शिर्डी चंद्रपूर अकोला नागपूर चिमूर धामणगाव या ठिकाणी मतदार यादीत गोंधळ केला गेला आहे. निवडणूक आयोग सरकारचा कठपुतळी झाल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. हा सर्व प्रकार धकादायक असून लोकशाही संपवणारा आहे. त्यामुळे मतदार यादी चेक कराव्यात आणि भाजप कटकारस्थान करून पुन्हा एकदा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहे त्याची कल्पना मित्र पक्षांना सुद्धा नसल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Local ad 1