Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ।मतदार यादीत नाव लगेच शोधून घ्या ; यादीतून नावे वगळले जात असल्याचा महाविकास आघाडीचा गंभीर आरोप

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 । विधानसभा निवडणूक जाहिर झाली असून, 19 ऑक्टोंबर हे मतदार यादीत नाव नोंदविण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र, राज्य शासनाने नेमलेले योजनादूत यांच्या मतदतीने नावे वगळली जात असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन केला आहे. त्यामुळे आजच आपले नाव यादीत तपासून घ्या, असे आवाहनही करण्यात आले आहे. (How to find name in voter list)

राज्यामध्ये महाविकास आघाडीचे आमदार असलेल्या मतदारसंघातून सात नंबरचा फॉर्म वापरून पाच ते दहा हजार नावे कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहेत. या संदर्भात महाविकास आघाडीचे नेते निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत. निवडणुकीमध्ये हेरगिरी लज्जास्पद असल्याचा आरोपही केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, अंबादास दानवे, शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगासह महायुती सरकारवर टिका केली आहे.

मतदार यादीमधून नावे गहाळ होण्यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट हात असल्याचा गंभीर आरोप सुद्धा नाना पटोले यांनी केला. हिंमत असेल तर समोरून लढा, भाजपचा रडीचा डाव करून जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघात नाना पटोले यांनी केला.

नाना पटोले म्हणाले की, प्रत्येकाने मतदार यादीमध्ये आपलं नाव चेक करा. हरतील म्हणून ते रडीचा डाव करत आहेत. दरम्यान, महायुतिकडून योजनादूत  बोगस असून त्यांची नियुक्ती तत्काळ रद्द करा अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. महाराष्ट्राची तिजोरी यांच्यापासून वाचवली पाहिजे, असे नाना पटोले म्हणाले. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा गंभीर आरोप केला. ते म्हणाले की फॉर्म 7 भरून प्रत्येक मतदारसंघांमध्ये 5 हजार नावे कमी करण्याच्या षड्यंत्र रचले जात आहे. जिवंत माणसे मृत दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Local ad 1