राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये हेमंत पाटील ; नांदेडला मिळाला आणखी एक आमदार 

आज दुपारी होणार शपथविधी

नांदेड. राज्यापाल नियुक्त सात आमदारांना विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. निलम गोऱ्हे (Deputy Chairman of Legislative Council Dr. Nilam Gorhe) आज दुपारी बारा वाजता शपथ देणार आहेत. त्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदार संघाचे माजी खासदार हेंमत पाटील (Former MP Hemat Patil) यांचा समावेश आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. निलम गोऱ्हे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात हेमंत पाटील यांचे नाव आहे. त्यामुळे आता हेमंत पाटील यांच्या रुपाने आणखी एक आमदार नांदेडला मिळाणार आहे.  (Name of Hemant Patil among the Legislative Council members appointed by the Governor)

शिवसेनेमध्ये उभी फुट पडल्यानंतर हेमंत पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहिले. लोकसभा निवडणुकीत पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना वाशिम – यवतमाळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली. मात्र, त्यांचा पराभव झाला. त्यानंतर हेमंत पाटील यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांची बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष करण्यात आले. त्यानंतर आता त्यांची राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये नाव आले आहे. त्यामुळे आता विधान परिषदेचे आमदार होणार आहेत.

शपथ घेणारे कोण आहेत सदस्य

शपथ घेत असलेल्या नामनियुक्त सदस्यांमध्ये चित्रा किशोर वाघ, विक्रांत पाटील, धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड,  पंकज छगन भुजबळ, इद्रिस इलियास नाईकवाडी, हेमंत श्रीराम पाटील  आणि डॉ मनीषा कायंदे (Chitra Kishore Wagh, Vikrant Patil, Dharma Babusingh Maharaj Rathod, Pankaj Chhagan Bhujbal, Idris Elias Wadi, Hemant Sriram Patil and Dr Manisha Kayande) यांचा समावेश आहे.
Local ad 1