राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या ओबीसी सेल जिल्हाध्यक्षपदी शिवकांत देवकत्ते यांची निवड 

 

नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी शिवकांत देवकत्ते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खा. सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते महाराष्ट्र अध्यक्ष ओबीसी विभाग राज राजापुरकर यांनी निसर्ग मंगल कार्यालय, पुणे येथे दिले आहे. (Shivkant Devkatte as OBC Cell District President of NCP Sharad Chandra Party)

 

 

 

नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी देवकत्ते यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. देवकत्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेउन त्यांच्यावर नवीन जबाबदारी टाकण्यात आली आहे. पक्षाने दाखवलेला विश्वास पात्र ठरविण्यासाठी काम करू, तसेच नांदेड जिल्हयातील ओबीसी समाजबांधव पक्षाशी जोडण्यासाठी प्रयत्न करु, असे देवकत्ते यांनी सांगीतले आहे.

 

नांदेड जिल्ह्यात शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारांच्या नागरिकांमध्ये आंनदाचे वातावरण आहे. सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याप्रसंगी नांदेड जिल्हा अध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर व ओबीसी विभाग राज्य उपाध्यक्ष रामचंद्र येईलवाड यांनी देवकत्ते यांना शूभेच्छादि ल्या.

Local ad 1