Ratan Tata Death : सर्वांसाठी नेहमीच खंबीर असलेले रतन टाटा (Ratan Tata) वैयक्तिक आयुष्यात मात्र एकटेच होते. तब्बल 4 वेळा प्रेमात पडलेले रतन टाटा आयुष्यभर सिंगलच राहिले. आज त्यांच्या जाण्याने कधीकाळी त्यांनी जिच्यावर जिवापाड प्रेम केले, त्यांच्या भावनांचाही बांध फुटला आहे. रतन टाटांची एक्स गर्लफ्रेंड, जीवलग मैत्रिण आणि अभिनेत्री सिमी गरेवाल (Tan Tata’s ex-girlfriend is actress Simi Grewal) या रतन टाटांच्या जाण्याने भावूक झाल्या आहेत. त्यांनी ट्वीट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. (Ratan Tata Death. Ratan Tata’s Ex Girlfriend Says Goodbye My Best Friend…)
रतन टाटांची एक्स गर्लफ्रेंड, जीवलग मैत्रिण आणि अभिनेत्री सिमी गरेवाल यांचे ट्वीट
https://x.com/Simi_Garewal/status/1844090170897059933
सिमी गरेवाल यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर रतन टाटा यांच्यासोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. सिमी गरेवाल यांचा प्रसिद्ध शो Rendezvous with Simi Garewal मध्ये रतन टाटांनी हजेरी लावली होती. त्यावेळी रतन टाटांनी या कार्यक्रमात आपल्या आयुष्याबाबत अनेक खुलासे केले होते.
रतन टाटांसोबतचा फोटो शेअर करत सिमी गरेवाल यांनी एक भावूक पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, “ते म्हणतात की तू गेलास… तुझं नुकसान सहन करणं खूप कठीण आहे… खूप कठीण आहे… गुडबाय माझ्या जिवलग मित्रा…”
स्वतः केलेला खुलासा
प्रसिद्ध अभिनेत्री सिमी गरेवाल यांचा रतन टाटांवर जीव जडला होता. त्या जीवापाड प्रेम करायच्या. 2011 मध्ये ETimes ला दिलेल्या मुलाखतीत स्वतः सिमी अग्रवाल यांनी हे मान्य केलं होतं. सिमी गरेवाल यांना रतन टाटा यांच्यासोबतच्या नात्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना अभिनेत्रीनं सांगितलं होतं की, त्यांना काही काळ रतन टाटा यांना डेट केलं होतं. नंतर त्यांचं ब्रेकअप झालं, पण, ते नेहमीच चांगले मित्र राहिले आहेत.
रतन टाटा वर कौतुकाचा वर्षाव
रतन टाटांचे कौतुक करताना सिमी गरेवाल म्हणाल्या होत्या की, “त्यांचे आणि माझे खूप जुने नाते आहे. तो परिपूर्ण आहे, आणि त्याचा सेंस ऑफ ह्यूमर कमाल आहे. तो परफेक्ट जेंटलमॅन आहे. त्याच्यासाठी पैसा कधीच महत्त्वाचा नव्हता.”