पुणे. लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या झटक्यामुळे महायुती सरकार मधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बहिणी आठवल्या आहेत. त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी बहिण योजना (Mukhyamantri Mazi Bahin Yojana) सुरु केली. त्यात महिन्याला 1500 रुपये देण्याची घोषणा केली. त्याची अंमलबजावणी सुरु झाली. मात्र, आपण आपल्या बहिणाला कोणत्याही पद्धतीने केलेली मदत लोकांना सांगत फिरत नाही. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजीत पवार (Deputy Chief Minister Devendra Fadnavis and Ajit Pawar) बहिणींना आर्थिक मदत करत असल्याची जाहिरातबाजी करत आहेत, अशी टिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या प्रा.सुषमा अंधारे यांनी केली आहे. (Does anyone advertise helping a sister? – Prof. Sushma Andhare)
ठाकरे गटाच्या वतीने महाड,पोलादपूर, मानगाव विधानसभा मतदार संघातील पुण्यातील रहिवासी नागरिकांशी संवाद मेळाव्याचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सुषमा अंधारे बोलत होत्या. याप्रसंगी माजी मंत्री शशिकांत सुतार, माजी आमदार महादेव बाबर, शहर संपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, रघुनाथ कुचीक, स्नेहल जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सुषमा अंधारे म्हणाल्या, या राज्यातील मुली शाळेत, बस मध्ये, हॉस्पीटल मध्ये डॉक्टर, नर्स सुरक्षित नाही. याबद्दल पोलिसांना काय बोलावे. ते स्वता: सुरक्षित नाहीत. त्यांच्यावर कोयत्याने हल्ले करतांना आरोपी नाहीत. तर दुसरीकडे रिक्षा चालक ते मुख्यमंत्री पदाच्या प्रवासात एकनाथ शिंदे यांना कधीही बहिण आठवली नाही. मात्र लोकसभेच्या निवडणूकीत बहिणींने दाखविलेल्या हिसक्यामुळे त्यांना लाडकी बहिण सारखी योजना आणावी लागली. बहिणीला मदत केल्यावर आपण त्याची बॅनरबाजी, जाहिरात करतो का? असा प्रश्न उपस्थित करत हे त्या म्हणाल्या की, हे भाऊ बहिणींच्या मतावर टपले आहेत. महायुतीचे सरकार महिलांकडे केवळ मतदार म्हणून पाहत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
महाड,पोलादपूर, मानगाव विधानसभा मतदार संघातील पुण्यात स्थाईक असलेल्या मतदारांशी आयोजित संवाद कार्यक्रमात अंधारे बोलत होत्या. यावेळी शिवेसेनेच्या (उबाठा) उमेदवार स्नेहल माणिक जगताप, माजी मंत्री शशिंकात सुतार यांच्यासह शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थुरकुटे आदी उपस्थित होते.
लाडकी बहिण योजना राज्याला आर्थिक दृष्ट्या परवडणारी नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, सत्ताधाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा धसका घेतला होता. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना सुरु केली. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आम्ही बहिणांना कशी आर्थिक मदत करत आहोत, हे सांगणाऱ्या जाहिराती करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजीत पवार राज्यातील महिलांना महिन्याला 1500 रुपये देत आहेत. तर आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना मदत केल्याचे 10 हजार रुपये खर्चून बॅनर लावत आहेत. महिलांना ते बहिण न मानता केवळ मतदार म्हणुन त्यांच्याकडे बघत आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांना केवळ त्यांची मते हवी आहेत, अशी टिका प्रा.सुषमा अंधारे यांनी केली.
प्रा.सुषमा अंधारे म्हणाल्या, कपट कारस्थान करून उध्दव ठाकरे यांना वर्षा बंगल्याचे पायऱ्या उतरायला लागल्या आहेत, त्या घरच्या पायऱ्या चढण्यासाठी सन्मानाने मुख्यमंत्री म्हणून जाण्यासाठी राज्यातील प्रत्येक जागा महत्वाची आहे. ती विजयी झाले पाहिजे, यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी प्रयत्न करावे. महाड,पोलादपूर, माणगाव विधानसभा मतदारसंघातून भरत गोगावले यांची गुंडगिरी वाढली असून, त्यांना विधानसभा निवडणुकीत घरी बसवायचे आहे, त्यासाठी शिवसैनिकांनी एक दिलाने काम करुन आपल्या उमेदवार स्नेहल माणिक जगताप यांनी विजयी करावे, असे अंधारे म्हणाल्या.
महिला सुरक्षित नाहीत
गेल्या काही दिवसांमध्ये ज्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्या पाहता महिला आणि मुली सुरक्षित नाहीत. मुख्यमंत्रा एकनाथ शिंदे आणि गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमचा विश्वास नाही. कारण त्यांनी प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये आपली माणसे आणून बसवली आहेत. ते अधिकारी त्यांना हव त्या प्रमाणे गुन्हे दाखल करत आहेत.