Haryana, Jammu-Kashmir Assembly Election 2024 Exit Poll Live : हरियाणा – जम्मू काश्मीरमध्ये मतदारांचा कल कोणाकडे?
हिरायणामध्ये 90 जागांसाठी १०३१ उमेदवार निवडणूक रिंगणात
हरियाणामध्ये जवळपास महिनाभराच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर राज्यात आज मतदार पार पडले. राज्यातील २ कोटी ३ लाख मतदार हे १०३१ उमेदवारांमधून ९० आमदार निवडून देणार आहेत. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान झालं. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांमध्ये ९३० पुरुष आणि १०१ महिला आहेत. ४६२ उमेदवार अपक्ष आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ६७.७४ टक्के मतदान झालं होतं. (Haryana Jammu-Kashmir Assembly Election 2024 Exit Poll Live)
हरियाणात विधानसभेच्या ९० जागा असून, त्यासाठी शनिवारी मतदार पार पडले. त्याचे Exit Poll समोर आले आहेत. विविध संस्थांनी केलेल्या सर्व्हेक्षणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यात Jist Tif Reserach : जस्ट टीफ रिसर्चनुसार हरियाणात ९० पैकी काँग्रेसला ४५ ते ५३ जागा मिळतील, असा व्यक्त केला आहे. तर सध्या सत्तेत असलेल्या भाजपला मोठा झटका बसत असल्याचे दिसून येत आहे. भाजपला २९ ते ३७ जागांपर्यंत जागा मिळू शकतात. इतरांना ४ ते १० जागा मिळू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दैनिक भास्करच्या मते काँग्रेसला बहुमत हे काठावरचे मिळणार आहे. बहुमताचा आकडा हा ४६ आहे पण त्यांना ४४ ते ५४ दरम्यात जागा मिळू शकता असा अंदाज दिला आहे. तर भाजपला १९ ते २९ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. ध्रुव रिसर्चच्या मते काँग्रेसला बहुमत मिळणार असून त्यांना ५० ते ६४ जागा मिळू शकतात. तर भाजप २२ ते ३२ जागा मिळवू शकतो. पिपल पल्स या एक्झीट पोलने काँग्रेसला बहुमत मिळणार अशी शक्यता वर्तवली आहे.
हरियाणातील गेल्या निवडणुकीचे एक्झिट पोल
न्यूज 18-Ipsos एक्झिट पोल
भाजप-70 जागा
काँग्रेस – 10 जागा
इतर-4 जागा
टाइम्स नाऊ एक्झिट पोल – ABP-C Voter Exit Poll
भाजप-71 जागा
काँग्रेस – 11 जागा
इतर- 08 जागा
रिपब्लिक-जन की बात -Republic-Jan Ki Baat
भाजप- 52-63 जागा
काँग्रेस- 15-19 जागा
इतर- 7-10 जागा
एबीपी-सी मतदार एक्झिट पोल
भाजप- 72 जागा
काँग्रेस- 08 जागा
इतर- 10 जागा
C Voter Exit Poll Of Jammu Kashmir Election भाजपला २७ ते ३२ जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडी बहुमताच्या जवळ जात असून, ४० ते ४८ जागा मिळू शकतात, असा अंदाज आहे. जम्मू और कश्मीर पीपुल्स डेमोक्रेटिक पार्टीला ( पीडीपी ) ६ ते १२ जागांपर्यंत मिळू शकतात. तर इतरांना ६ ते ११ जागा मिळू शकातात. दैनिक भास्करनुसार इंडिया आघाडीला बहुमतच्या आसपास जागा मिळतील पण संपूर्ण बहुमताचा आकडा पार करण्यासाठी इतर पक्षांची गरज पडणार आहे. Jammu and Kashmir Exit Poll Result: पिपल पल्सनेनुसार जम्मू आणि काश्मीरमध्ये इंडिया आघाडी बाजी मारेल. Jammu and Kashmir Exit Poll Result : जम्मू काश्मीरमध्ये सी वोटरच्या एक्झीट पोलच्या आधारे भाजप हा सर्वात मोठा पक्ष होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.