...

खाद्यतेलाची आयात घटल्याने दिवाळीत तळण होऊ शकते महाग ?

पुणे. केद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ (Increase in import duty on edible oil) केल्यामुळे खाद्यतेलाची आयात मोठ्या प्रमाणावर घटली असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे. दिलेल्या माहितीनुसार पामतेलाची ३४ टक्क्यांनी, सोयाबीन तेलाची १५ टक्क्यांनी आणि सूर्यफूल तेलाची ४९ टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे दिवाळीमध्ये खाद्य तेलाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, परिणामी तेलाच्या किंमती वाढू शकतात, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (Edible oil will be expensive in Diwali)

 

 

ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये पामतेलाची आयात ३४ टक्क्यांनी घटली आहे. (Imports of palm oil fell by 34 percent)  ऑगस्टमध्ये ५.३० लाख टन तेलाची आयात झाली होती. पामतेलाची आयात गेल्या सहा महिन्यांतील सर्वात कमी आयात ठरली आहे. पामतेलासह सप्टेंबरमध्ये सोयाबीन तेलाची आयात १५ टक्क्यांनी घटली असून, ३.८८ लाख टनांची आयात झाली आहे. सूर्यफूल तेलाच्या आयातीला मोठा फटका बसला असून, ४९ टक्क्यांनी आयात कमी झाली आहे. ही गेल्या दहा महिन्यांतील नीचांकी आयात ठरली आहे. सप्टेंबरमध्ये केवळ १.४५ लाख टन आयात झाली आहे.

 

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज जमा होणार PM किसान योजनेचा 18 वा हप्ता 

 

केंद्र सरकारने आयात शुल्क वाढविल्यामुळे आणि इंडोनेशिया, मलेशियाने (Indonesia, Malaysia) वाढवलेल्या निर्यात शुल्कामुळे पामतेलाची आयातीचा दर जवळपास सोयाबीन आणि सूर्यफूल तेला इतकाच झाला आहे. त्यामुळे खाद्यतेल कंपन्यांनी शुद्ध आणि कच्च्या पामतेलाची आयात जवळपास बंद केली आहे. तर आयात शुल्क लागू करण्यापूर्वी कमी दराने आयात झालेला सुमारे ३० लाख टन तेलाचा साठा शिल्लक असल्यामुळे सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयातही कमी झाली आहे. वाढलेल्या दरामुळे आयातदार यांनी, अनेक खाद्य तेल कंपन्यांनी पामतेल आयात रद्द केली आहे किंवा पुढे ढकलली आहे. सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आवस्था यापेक्षा वेगळी नाही.

 

पामतेलाच्या दरात घट झाल्यानंतरच पामतेल आयातीला गती मिळण्याची शक्यता आहे. तर सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाची आयात (Import of sunflower and soybean oil) हळूहळू वाढले, असा अंदाज आहे. मात्र, आयातदार तेलाचा साठा करून ठेवण्याच्या मनस्थितीत नाहीत. जितके तेल लागते तितकेच आयात करण्याचे धोरण अवलंबिले जात आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्यात आयातीत काहिशी वाढ होण्याचा अंदाज आहे. भारत पामतेल इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडमधून आयात करतो. तर सोयाबीन आणि सूर्यफूल तेल अर्जेंटिना, ब्राझील, रशिया आणि युक्रेनमधून आयात करतो.

Local ad 1