मुंबई Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana : दसरा आणि दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपले असून, आज केंद्र सरकार शेतकऱ्यांना फेस्टिवल गिफ्ट देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे आज शनिवारी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) 18 वा हप्ता जारी करणार आहेत. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी (ता. मानोरा) येथील कार्यक्रमात सुमारे ३९०० कोटी रुपये ९१.५२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana) ही हप्ता जमा होणार आहे. (The 18th installment of PM Kisan Yojana will be deposited in farmers’ bank accounts today)
ई-केवायसी झाली का चेक करुन घ्या – Check whether e-KYC is done
शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार ३९०० कोटी – 3900 crores will be deposited in the account of farmers
पीएमकिसान योजनेच्या १८ व्या हप्त्यापोटी एकूण ९१.५२ लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात १९०० कोटीहून अधिक रक्कम तर राज्याच्या योजनेमधून २००० कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.