पुणे : लोकसेवकांच्या भ्रष्टाचारविषयक तक्रारी नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सादर करता याव्यात याकरीता तालुक्यांच्या शासकीय विश्रामगृहस्थळी सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सहायक आयुक्त दयानंद गावडे यांनी दिली आहे. (No need to go to taluka place to report corruption.. ACB will come to your doorstep)
भोर येथे मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी, लोणावळा ९ ऑक्टोबर, बारामती १० ऑक्टोबर, खेड राजगुरुनगर ११ ऑक्टोबर, नारायणगांव १२ ऑक्टोबर, दौंड १३ ऑक्टोबर, सासवड १४ ऑक्टोबर, शिरुर १९ ऑक्टोबर, इंदापूर २० ऑक्टोबर आणि जुन्नर येथे २७ ऑक्टोबर २०२४ रोजी विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.