Swachh Bharat Mission गावातील स्वच्छता राखण्यासाठी आपल्या अधिकारांचा वापर करा : चंद्रकांत पुलकुंडवार
Swachh Bharat Mission पुणे. स्वच्छ भारत मिशनची (Swachh Bharat Mission) अंमलबजावणी सुरू असून गावपातळीवर शौचालये बांधून व वापरून तसेच घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करून प्रदूषणमुक्त गावांचे मॉडेल घोषित केले जात आहे. गावात स्वच्छता राखण्यासाठी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून प्रदूषण करणाऱ्यांविरोधात प्लास्टिक बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार (Divisional Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar) यांनी दिले. (Use your rights to maintain village cleanliness : Chandrakant Pulkundwar)
स्वच्छ भारत मिशन सुरू होऊन 10 वर्षे झाली आहेत. या 10 वर्षात गावे आणि शहरे स्वच्छ होत आहेत. यामध्ये नागरिक सहभागी होत आहेत. गेल्या 10 वर्षांपासून दरवर्षी या अभियानांतर्गत स्वच्छता हे सेवाकार्य आहे. 14 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण भारतात लागू करण्यात आला आहे. त्यामुळे स्वच्छतेसाठी जनआंदोलन निर्माण झाले आहे.
स्वच्छता ही सेवा 2024 उपक्रमाची सांगता माण ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छ भारत दिवस म्हणून करण्यात आली. त्यावेळी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Collector Suhas Diwase) , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील ( Zilla Parishad Chief Executive Officer Santosh Patil) , मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विजयसिंह नलावडे, पाणी व स्वच्छता विभागाचे अप्पासाहेब गुजर आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. तसेच सफाई कामगारांचा (सफाईमित्र) सत्कार करण्यात आला. त्यांना स्वच्छता किटचे वाटप करण्यात आले. याशिवाय ग्रामस्थांना सार्वजनिक डस्टबिनचे वाटपही करण्यात आले. स्वच्छ में आंगन उपक्रमांतर्गत महिलांचा गौरव करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.