OBC leader Laxman Hake । ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केले की नाही ?; आली प्राथमिक माहिती

OBC leader Laxman Hake । पुणे : ओबीसी नेते लक्ष्मण हाके मद्यप्राशन करताना आढळल्या  आरोप मराठा कार्यकर्त्यांनी केला होता.  त्यानंतर मद्यपानाची चाचणी करण्यासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात नेले होते. त्यासंदर्भात आलेल्या प्राथमिक माहितीनुसार हाके यांनी मद्यपान केले होती की नाही, याविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे.  (OBC leader Laxman Hake drank alcohol or not? Preliminary information)

 

 

 

सोमवारी रात्री मराठा व ओबीसी समाजाचे कार्यकर्ते रुग्णालयासमोरच आमने-सामने आले होते.  या घटनेनंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकांकडून पोलिसांना परस्पर तक्रारी दिली आहे. यावर पोलिसांनी कारवाई करत 20 ते 25 मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे. हा पूर्वनियोजित कट असून आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचा दावा हाकेंनी केला आहे.

 

लक्ष्मण हाकेंना जीवे मारण्याचा प्रयत्न?

लक्ष्मण हाके यांच्या घरापासून 500 ते हजार मीटर अंतरावर असताना दोन इसम हाके यांच्या जवळ आले. ‘सुरुवातीला जुजबी संवाद साधला. नंतर खाली उतरताच पाच ते सहा चार चाकी येऊन मला पकडले. हात आणि मान पकडत मला जिवे मारण्याचा प्रयत्न’ केल्याचा लक्ष्मण हाके यांनी माध्यमांना सांगितले. मध्य प्राशन करत नसेल तर मराठा कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा आंदोलकांचा आरोप आहे.

 

लक्ष्मण हाके व मराठा आंदोलकांकडून पोलिसांना परस्पर तक्रारी 

पुण्यातील कोंढवा भागात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मद्यपान केल्याचा आरोप मराठा कार्यकर्त्यांनी केला असून याबाबतचा व्हिडिओ ही समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. दारूच्या नशेत हाके यांनी मराठा कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली असल्याचा आरोप मराठा कार्यकर्त्यांनी केला असून ससून रुग्णालयासमोर मराठा ओबीसी कार्यकर्ते पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचे चित्र होते. मद्यपानाच्या आरोपावरून लक्ष्मण हाके व मराठा कार्यकर्त्यांनी परस्पर कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) तक्रारी दाखल केल्याचे समजते.

 

 

मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल

सोमवारी मध्यरात्री ससून रुग्णालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत मराठा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचे चित्र होते. याबाबत लक्ष्मण हाके यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी 20 ते 22 मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे. ओबीसी आंदोलन लक्ष्मण हाके यांच्या तक्रारीवरून हा पूर्वनियोजित कट असून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांनी आरोप केला आहे.

 

 

लक्ष्मण हाके यांनी मद्यपान केले की नाही?

मद्यपानाचा मुद्द्यावरून झालेल्या या वादानंतर ओबीसी आंदोलन लक्ष्मण हाके यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. प्राथमिक अहवाला त्यांनी दारू पिलेली नव्हती असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला असून पुन्हा खात्री करण्यासाठी लक्ष्मण हाके यांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या चाचणीचा अहवाल घेण्यासाठी आणखी एक दोन दिवस लागू शकतात.

 

Local ad 1