शिबिराचे उद्घाटन ताराचंद करमचंदानी (झोनल इन्चार्ज-पूना झोन) यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी ते म्हणाले की, रक्ताला पर्याय नाही, रक्तदान हीच सर्वात मोठी मानव सेवा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी पुणे झोन मध्ये मिशनद्वारा दर महिन्याला तीन ते चार रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात, ज्यामध्ये अनेक रक्तदाते सहभागी होत असतात.
Related Posts
बाबा हरदेव सिंहजी महाराज (Baba Hardev Singh Maharaj) यांनी मानवतेला संदेश दिला कि ‘रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे.
संत निरंकारी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी, नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल, मिशन चे अनुयायी यांचे योगदान लाभले.
https://www.mhtimes.in Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.