पुणे. पुणेकर कुठेही मागे नसतात. प्रत्येक गोष्टीमध्ये पुणेकर अव्वल स्थानी असतात. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून (Municipal Solid Waste Management Department) सार्वजनिक जागी थुंकणे, कचरा जाळणे, अस्वच्छता करणे (Spitting, burning garbage, littering in public places) आदी कारणांसाठी दंडात्मक कारवाईला ही पुणेकर सामोरे गेले आहेत. विभागाने ही कारवाई आता गंभीरपणे हाती घेतली आहे. १ ऑक्टोबर २०२३ ते २६ सप्टेंबर २०२४ या कालावधीत सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून सव्वा तीन कोटींचा दंड वसूल केला आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सार्वजनिक जागी थुंकणे, कचरा जाळणे, अस्वच्छता करणे आदी कारणांसाठी दंडात्मक कारवाई केली जाते. १ ऑक्टोबर २०२३ ते २६ सप्टेंबर २०२४ या कालावधीत सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून सव्वा तीन कोटींचा दंड वसूल केला आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी गेल्या वर्षभरात ६० हजाराहून अधिक पुणेकरांवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. (From 60 thousand Pune residents 3. 25 Crores to recover a fine of Rs)
महापालिकेने सार्वजनिक जागी स्वच्छता राखण्यासाठी स्वच्छता उपविधी तयार केली आहे. त्या नियमानुसार अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. यामध्ये सार्वजनिक जागी थुंकणे, लघवी करणे, कचरा जाळणे, कचऱ्याचे सुका आणि ओला असे वर्गीकरण न करणे, नदीत राडारोडा टाकणे आदी गोष्टींचा समावेश आहे. यासाठी १८० रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने ही कारवाई सुरू केली असल्याचे घनकचरा विभागाचे उपायुक्त संदिप कदम यांनी सांगितले.
असा केला दंड वसूल