पुण्यात काचेच्या कारखान्यात चार कामगारांचा जागीच मृत्यू

पुणे. कोंढवा परिसरातील येवलेवाडीतील एका काचेच्या कारखान्यात भीषण दुर्घटना घडली. याच चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन कामगार गंभीर जखमी झाले. कंटेनरमधून काचाचे भले मोठे ‘शीट‘ काढत असताना सेफ्टी बेल्टचे (Safety belt) हुक निसटले आणि दोन काचेच्या शीट व कंटेनरमध्ये अडकल्याने या कामगारांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. (Four workers died on the spot in a glass factory in Pune)

 

 

अमित शिवशंकर कुमार (वय २७), विकास सर्जू प्रसाद गौतम (वय २३), धर्मेंद्र सत्यपाल कुमार (वय ४०) आणि पवन रामचंद्र कुमार (वय ४४, रा. सर्व. धांडेकरनगर,  हॉलीव हॉस्टेल, पहिला माळा, येवलेवाडी. मुळ. रा. रायबरेली, उत्तर प्रदेश) अशी मृत्यू झालेल्या मजुरांची नावे आहेत. तर जगतपाल संतराम सरोज (वय ४९) व मोनेश्वर  अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, येवलेवाडीतील सीएनजी पेट्रोल पंपाच्या मागे काही कंपन्या व त्यांचे गोडाऊन आहे. या भागात ‘इंडिया ग्लास सोल्युशन’ नावाने काचेचा मोठा कारखाना आहे. येथे परदेशातून मोठं-मोठ्या काचेचे शीट आणले जातात. तसेच या कारखान्यात या काचांवर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर ते विक्रीसाठी बाजारात आणले जातात. इंडिया ग्लास सोल्युशन या कंपनीचा मालक “हुसेन तय्यबअली मिठावाला” (वय ३५) हा असल्याची माहिती कोंढवा पोलिसांनी दिली. कंपनीत काचाचे कटींग तसेच त्यावर प्रक्रियाकरून ते बाजारात विक्रीसाठी आणले जातात. दरम्यान, हा काच कारखान्यात बाहेरून येतो. ते कामगार उतरवून घेत असताना ही घटना घडली.

रविवारी दुपारी एकच्या सुमारास काचेचा कंटेनर काचेच्या ‘शीट’ घेऊन आलेला होता. ह्या काचेची शीट उतरवून घेण्याचे काम १० ते १२ कामगार करत होते. तेव्हा मोठे काचेच्या शीट खाली उतरवताना काचेचे स्लाईडला बांधलेला सेफ्टी बेल्ट चे हुक निसटले आणि त्यातील दोन मोठ्या शीट कोसळल्या. कंटनेर व काचेच्या शीटच्यामध्ये चार कामगार दबले गेले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

 

दहा एमएम जाडीचा असलेल्या एका काचेच्या शीटचे वजन साधारण ‘दोन टन’ आहे. हा काच समुद्रातून थेट कंटेनरमधूनच येथे आणला जातो. तसाच कंटेनर हा पुण्यातील येवलेवाडीमध्ये आला होता. कंपनीच्या प्रवेशद्वारावर कंटेनर पाठिमागे (रिव्हर्स) घेऊन उभा केलेला होता. त्यातील काचेच्या शीट काढल्या जात होत्या. कंटेनरच्या शेवटच्या बाजूला ६ कामगार आणि पुढच्या बाजूला ६ कामगार या काच खाली घेत होते. शीट खाली घेत असतानाच सेफ्टी बेल्ट निसटला आणि त्यातील शीट या खाली कोसळल्या. (कंटनेरमध्ये शीट एका बाजूला पडल्या) त्यावेळी कंटेनरच्या पाठिमागच्या बाजूला असलेल्या ६ ही कामगार यामध्ये दाबले गेले. त्यात गंभीर जखमी झाल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर, दोघे जखमी झाले आहेत.

Local ad 1