Purandar Airport land । पुरंदर विमानतळाच्या जमीन अधिगृहना विषयी मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देश !
Purandar Airport land । पुरंदर विमानतळासाठी लवकरात लवकर जमीन अधिग्रहन करा. शेतकऱ्यांना जागेचा योग्य मोबदला द्या. त्यांचे नुकसान होता कामा नये, अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगमंत्री उद्य सामंत यांना दिल्या. तसेच, यासाठी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत बैठक घ्या. त्यात काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल,असे शिंदे यांनी सांगितले.(Important instructions of Chief Minister to Industries Minister regarding Purandar Airport land acquisition)
जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो मार्ग (District Court to Swargate Metro Route), स्वारगेट कात्रज भुयारी मार्ग (Swargate – Katraj Subway Metro Line), भिडे वाडा शाळा स्मारक (Bhide Wada School Memorial) भूमिपूजन, बिडकीन औद्योगिक स्मार्ट सिटी (Bidkin Industrial Smart City) लोकार्पण, सोलापूर विमानतळ (Solapur Airport) अशा विकासकामांचे लोकार्पण, भूमीपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी कार्यक्रम शिंदे बोलत होते. यावेळी केंद्रिय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, की गेल्या गुरूवारी हा कार्यक्रम होणार होता. पावसामुळे कार्यक्रम पुढे ढकलला. कार्यक्रमासाठी आपली तयारी होती. पण, लोकांना त्रास होऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी तो रद्द केला. बारीक गोष्ट लक्षात घेऊन संवेदनशील प्रधानमंत्री कसा असतो हे त्यांनी दाखवून दिले. आजचा दिवस देशासाठी व पुणेकरांसाठी आनंदाचा आहे. पुणे चारही बाजूने वाढत आहे. आयटी सिटी, शिक्षणाचे शिक्षणाचे जाळे वाढत आहे. वाहतूक व्यवस्थेवर ताण पडत आहे. यावर उपाय म्हणून मेट्रोचे जाळे वाढविणे काळाची गरज आहे. म्हणून मोदी यांनी मंजुरी दिली. त्याची उभारणी होऊन फळे हाती पडत आहेत.
फडणवीस म्हणाले, की वारसा आणि विकास या दोन्ही गोष्टींचा संगम करणारा हा कार्यक्रम आहे. क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले व क्रातीज्योती सावित्रीबाई फुले यांनी वारसा दिला तो पुढे घेऊन जाणारा हा कार्यक्रम आहे. भिडेवाडा येथे पहिली मुलींची शाळा सुरू झाली. त्या वारशाची आठवण करून देणारे स्मारक हे भिडेवाड्यामध्ये करण्याकरिता हा कार्यक्रम आहे. तसेच, वारशाबरोबरच विकासाचा कार्यक्रम आहे. पुणे मेट्रोच्या कामाला २०१४ नंतर गती मिळाली. त्यासाठी महामेट्रो ही कंपनी स्थापन केली. देशात पुणे मेट्रोचा पहिला टप्पा सर्वाधिक वेगाने काम पूर्ण होणारा टप्पा आहे. टाटाच्या माध्यमातून हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो करत आहोत. या सर्व माध्यमातून पुण्याच्या मेट्रोला व्यवस्थित करणाचे काम केले आहे. स्वारगेट मेट्रो स्टेशन हे मल्टीमोडल स्टेशन म्हणून विकसित करत आहोत. या ठिकाणी लोक मेट्रोतून जाण्याऐवजी हे स्टेशन पाहण्यासाठी येतील, असे डिझाईन बनविले आहे. मेट्रोचे पुढील टप्पे केल्यानंतर मेट्रोचे इंटिग्रेशन होईल. पुण्यात कुठेही मेट्रोतून प्रवास करता येईल. पुण्याजवळ एक लाख कोटींची कामे करत आहोत. पाच वर्षे कळ काढल्यानंतर ही कामे पूर्ण होतील. त्यानंतर नियंत्रित वाहतूक असलेले आणि वाहतुकीचे सोय असलेले पुणे हे एक महत्वाचे शहर असेल.
अजीत पवार म्हणाले, की पुणे पिंपरी चिंचवड परिसर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम झाल्याशिवाय येथील वाहतूक कोंडी सोडविता येणार नाही. हिंजवडी-शिवाजीनगर दरम्यान मेट्रोचे टाटा कंपनीकडून केले जात आहे. शहरात सध्या ही कामे सुरू असल्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यांची सहनशीलता संपत आली आहे. पण, पुढील पन्नास ते शंभर वर्षासाठी काम करायाचे असेल तर त्रास सहन करावे लागेल. आता ही कामे होत आली आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. त्या जागेवर स्मारक उभारण्यासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे. जागा मिळवण्यासाठी राज्य सरकारने सर्वस्व पणाला लावले. गंज पेठ येथील महत्मा फुले वाडा स्मारकाजवळ काही एकरामध्ये क्रांतीसुर्य ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्मारक करतोय. त्या जागेसाठी २०० कोटी खर्च अपेक्षित आहेत. बाधित होणाऱ्यांना योग्य मोबदला देण्यात येणार आहे. बिडकीन औद्योगिक प्रकल्प सुरू झाला असून ५२ हजार कोटीचे प्रकल्प येत आहेत. टोयोटा, किलोस्कर यांचे प्रकल्प येत आहेत. त्यामुळे तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार असून अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे.