Sassoon Hospital Pune । ससून रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत… कारण ऐकुण तुम्हांलाही येईल संताप

पुणे : ससून रुग्णालय एकेकाळी राज्यातील रुग्णांसाठी मोठे आधार मानले जात होते. मात्र, या रुग्णालयातील धक्कादाय प्रकार समोर येत आहेत. आधी किडनी प्रकरण समोर आले होते. त्यामुळे सामान्य रुग्णांनी जायाचे कुठे असा प्रश्न उपस्थित होता. त्यानंतर ड्रग्ज प्रकरणातील (Drug Case at Sassoon Hospital) आरोपी फरार होतो, त्यानंतर काय झालं हे संपूर्ण राज्याने पाहिले. नुकतेच कल्याणीनगर हिट अॅन्ड रन (Kalyani Nagar Hit And Run) प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणात दोन डॉक्टर गजाआड आहेत. आत एका नव्या कारनामुळे ससून रुग्णालय चर्चेत आले आहे. हे कारण ऐकून तुम्हालाही संताप आल्याशिवाय रहाणार नाही. एक रुग्णाला 24 हजार 500 रुपये खासगी मेडिकल चालकाकडे जाम करा, असे रुग्णालयातील डॉक्टर रुग्णाच्या नातेवाईकाला सांगतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रुग्णांवर उपचारासाठी पैसे मोजावे लागत असली तर तर गरीब रुग्णांनी कुठे जावावे, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. (Employee Of Sassoon Hospital Asked The Patient’s Relative For Money)

 

ससून रुग्णालयातील काही कर्मचारी खासगी मेडिकलवाल्यांसोबत मिळून गोरगरीब रुग्णांकडून पैसे उकळत असल्याचा लाजिरवाणा प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णांची शस्त्रक्रिया याेजनेतून माेफत झालेली असताना रुग्णांच्या नातेवाइकांना खासगी मेडिकलमधून औषधे, शस्त्रक्रियेचे साहित्य खरेदी करण्यास सांगत न्युराेसर्जरी विभागातील एका निवासी डाॅक्टरने तब्बल २४ हजार ५०० रुपयांची मागणी केल्याचा व्हिडीओ समाेर आला आहे. इतकेच नव्हे तर पैसे न दिल्यास पेशंट दगावण्याची भीती घालतानाच नातेवाइकांना पाेलिस केसमध्ये अडकवण्याची धमकीही या कर्मचाऱ्याने दिल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

 

ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणाचे लोण ससून पर्यंत पोहोचले : डॉ. अजय तावरे यांना अटक 

 

सय्यदनगर भागात एक विधवा महिला असून, तिच्या १७ वर्षीय मुलावर ससून रुग्णालयात काही दिवसांपूर्वी मेंदूची शस्त्रक्रिया झाली. त्याचा डिस्चार्ज करतेवेळी मात्र न्युरोसर्जरी विभागातील कर्मचाऱ्याने त्यांना २४ हजार ५०० रुपयांचे किट मेडिकल तेजपाल मेडिकलमधून आणण्यास सांगितले. तसेच तेजपाल मेडिकलमध्ये ते पैसे भरण्यास सांगितले. यानंतर रुग्णांच्या नातेवाइकांनी कोंढव्यातील जुबेर मेमन (Social activist Zubair Memon, Pune)या सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांच्या लाेकांनी हे स्टिंग ऑपरेशन करून हा प्रकार उघडकीस आणला. या स्टिंगमध्ये संबंधित डाॅक्टर हा रुग्णाच्या नातेवाईकांना पैसे मागताना दिसत आहे. यामुळे गरीब रुग्णांना लुटणाऱ्या डॉक्टरांची साखळीच असल्याचे समोर आले आहे.

 

 

या व्हिडीओमध्ये नातेवाइकांना कर्मचाऱ्याने या मुलाची शस्त्रक्रिया करण्यासाठी एक किट लागली आहे, असे सांगत त्या किटचे २४ हजार ५०० रुपये स्टेशन परिसरात असलेल्या मेडिकलमध्ये भरायला सांगतो. त्यावर नातेवाईक त्यांच्याकडे ८ हजार रुपये असल्याचे सांगतात. मात्र, हा डाॅक्टर काहीही न ऐकता त्यांना भीती घालतो की, काल एका नातेवाइकाने हे किट दिले नाही, त्यामुळे त्यांचा पेशंटचा मृत्यू झाला. इतकेच नव्हे तर तुम्ही जर पैसे दिले नाही तर तुमच्या सर्व नातेवाइकांवर एमएलसी केस टाकून पाेलिस केस करण्यात येईल, अशी धमकी हा कर्मचरी देताना दिसत आहे.

 

Local ad 1