MH Times Exclusive News । मराठवाड्यात महाविकास आघाडीला ३२ विधानसभा मतदार संघात आघाडी

MH Times Exclusive News : मराठवाड्यात लोकसभेच्या आठ जागा असून, त्यातील औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ वगळता सात जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. ४६ विधानसभा मतदार असून, त्यातील ३२ जागांवर महाविकास आघाडीला लीड मिळाली आहे. महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीप्रमाणे मजबुतीने निवडणुकीला सामोरे गेल्यास. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजुला गेलेले मताधिक्य परत मिळविण्यासाठी महायुतीला मोठी कसरत करावी लागणार आहे. (Mahavikas Aghadi leads in 32 assembly constituencies)

 

 

मराठाड्यातील छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघातून महायुतिकडून शिवसेनेचे संदिपान भुमरे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांची टक्कर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याशी होती. यात भुमरे यांनी जलील यांचा पराभव केला आहे. नांदेड, लातूर, जालाना आणि बीड येथील भाजपच्या चार खासदारांना पराभव स्वीकारावा लागला. तर हिंगोलीची जागा शिंदेकडून ठाकरेंनी परत मिळवला आहे.

धक्कादायक..! पोर्टेबल साेनाेग्राफी मशीनद्वारे गर्भलिंगनिदान ; पाठलाग करुन पोलिसांनी डाॅक्टर, एजंटला केली अटक

 

मराठवाड्यातील सात लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे नांदेड मधून वसंतराव चव्हाण (Nanded Lok Sabha Constituency Vasantrao Chavan), लातूर मधून डाॅ. शिवाजी काळगे (Latur Lok Sabha Constituency Dr. Shivaji Kalge), जालन्यातून कल्याण काळे (Jalna Lok Sabha Constituency Kalyan Kale) ठाकरेंच्या शिनसेनेचे परभणीमध्ये संजय जाधव (Parbhani Lok Sabha Constituency Sanjay Jadhav) आणि धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर (Dharashiv Lok Sabha Constituency Omraje Nimbalkar) यांनी आपला गड राखला आहे. बीडमध्ये चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काॅग्रेल शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे (Beed Lok Sabha Constituency Bajrang Sonwane) यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला आहे.

 

मराठवड्यात एकूण ४६ विधानसभा मतदार संघ असून, लोकसभेची अकडेवारीतून शिवसेनेला (उबाठा) १५, काँग्रेसला १४, राष्ट्रवादीला ३ तर एमआयआमला दोन विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळाल्याचे दिसून येत आहे. महायुतीमध्ये असेलल्या भाजपला ७, शिवसेना (शिंदे) ४ आणि रासपला एका ठिकाणी आघाडी मिळाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर असून, गेलेले मताधिक्य परत मिळवण्यासाठी महायुतीला तर महाविकास आघाडीला मिळालेले मताधिक्य टिकविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

 

Local ad 1