धक्कादायक..! पोर्टेबल साेनाेग्राफी मशीनद्वारे गर्भलिंगनिदान ; पाठलाग करुन पोलिसांनी डाॅक्टर, एजंटला केली अटक

पुणे :  बारामतीमधील माळेगावच्या गोफणे वस्ती येथे  पोर्टेबल साेनाेग्राफी मशीनद्वारे गर्भलिंगनिदान साेनाेग्राफी करणाऱ्या डाॅक्टरसह एजंटाला माळेगाव पाेलिसांनी (Malegaon) शुक्रवारी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोर्टेबल साेनाेग्राफी मशीनही जप्त केले आहे. याप्रकरणी बारामती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. महेश जगताप यांनी फिर्याद दाखल केली आहे. (Shocking… Facious Diagnosis by Portable Celebrity Machine)

 

गर्भलिंग निदान (Abortion diagnosis) करणारा डाॅ. मधुकर चंद्रकांत शिंदे (Dr.Madhukar Chandrakant Shinde) (वय ५२, रा. लक्ष्मीनगर, फलटण, जि. सातारा) आणि एजंट नितीन बाळासाहेब घुले (वय ३७, रा. ढेकळवाडी, ता. बारामती, जि. पुणे) असे या दाेघांना पाेलिसांनी पाठलाग करून पकडले आहे. विशेष म्हणजे डाॅ. शिंदेला अशा प्रकारच्या गुन्हयात अनेकवेळा अटक झाली आहे.

 

पुण्याच्या ग्रामीण भागात चारचाकी गाडीमध्ये गर्भलिंगनिदान होत असल्याची तक्रार जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. नागनाथ यमपल्ले (District Surgeon Nagnath Yampale) यांच्याकडे प्राप्त झाली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने डाॅ. यमपल्ले यांनी शिक्रापुर, यवत, दाैंड, इंदापुर व बारामती येथील वैदयकीय अधीक्षकांना पत्र लिहून याेग्य ती कारवाई करण्याच्या सूचना केल्या हाेत्या. त्याअनुषंगाने बारामती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. जगताप यांनी पोलिसांना डाॅ. शिंदे बाबत माहिती दिली होती.

पुणे जिल्हा परिषदेमध्ये इंटर्न म्हणून काम करण्याची संधी ; कोण करु शकतो अर्ज?

 

पोलिसांनी डाॅ. शिंदे याच्या माेबाईलचे काॅल रेकाॅर्ड तपासले असता ताे एजंट बाळासाहेब घुले याच्या संपर्कात असल्याचे आढळून आले. त्यानुसार बारामती पाेलीस ठाण्याचे पाेलीस उपनिरीक्षक युवराज घाेडके यांनी डाॅ. शिंदे आणि एजंट घुले या दाेघांना शुक्रवार दि. ७ जून राेजी गाेफणेवस्ती येथे साेनाेग्राफी मशीनसह पकडले. त्यांच्यावर गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व राेग निदानतंत्रे (लिंगनिवडीस प्रतिबंध) अधिनियम नुसार माळेगाव पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास माळेगाव पाेलीस ठाण्याचे निरीक्षक बालाजी भांगे करत आहेत.

अटक करण्यात आलेल्या डाॅ. मधुकर शिंदे हा या प्रकारचे गुन्हे करण्यात सराईत आहे. त्याच्यावर याआधी दाैंडमध्ये तसेच सातारा येथेही गुन्हे दाखल आहेत. ताे एजंट घुलेच्या मार्फत गर्भलिंग निदान करणा-या महिलांची पाेर्टाेबल साेनाेग्राफी मशीनद्वारे साेनाेग्राफी करून त्यांच्याकडून लाखाे रूपये उकळत असल्याचे उघडकीस आले आहे.

 

Local ad 1