(Deputy Chief Minister ajit pawar) एक एप्रिलला एप्रिलफुल समजू नका..!
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण ज्या गतीने वाढत आहेत. त्यामुळे लॅकडाऊन शिवाय पर्याय नाही, हे स्पष्ट झाले असून, रुग्ण वाढत राहिल्यास 1 एप्रिलला होणाऱ्या बैठकीत कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्यामुळे एक “एप्रिलला एप्रिलफुल समजा नका”, असा इशारा उमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. (Deputy Chief Minister ajit pawar)
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामीण भागातील वाढत्या कोरोना रुग्ण आणि उपाययोजनांचा आढावा अजित पवरा यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी दुपारी घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार उपस्थित होते. (Deputy Chief Minister ajit pawar)
खाजगी रुग्णालयातील 50 टक्के बेड हे कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाला रोखण्यासाठी नियमांचे पालन करुन आणि लसीकरणाची गती वाढविल्यास आपण कोरोना रोखू शकतो. सध्या 300 लसीकरण केंद्रात लसीकरण केले जात असून, ती संख्या दुप्पट म्हणजेच 600 केली जाणार आहे. त्यानंतर लसीचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रशासनस्तरावर केंद्राशी पत्रव्यवहार सुरु असून, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनी लसीचा पुरवठा कमी पडणार नाही, असे अश्वसन दिले आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. (Deputy Chief Minister ajit pawar)
ससूनमधील खांटाची संख्या 300 असून, ती वाढवून 500 केली जाणार आहे. तसेच सर्व लोकप्रतिनिधींनी आपले कार्यक्रम रद्द करावेत, असे अहवाहन करत 1 तारखेपासून कोणत्याही कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही. सध्या लग्नासाठी 50 तर अंत्यविधीसाठी 20 लोकांना परवनागी आहे. पुण्यातील सध्या पॅझिटिव्हिटी रेट 25 टक्के आहे. तो कमी करण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे पवार म्हणाले. (Deputy Chief Minister ajit pawar)
शहरातील सार्वजनिक वाहतूक सुरु असून, मागच्यावेळी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता. मात्र, सध्या पुरवठा सुरळीत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रायगड येथील उत्पादकाला संपर्क करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. रुग्ण वाढत असल्याने बंद करण्यात आलेले सर्व जम्बो सेंटर्स टप्प्या-टप्प्याने सुरु केले जात आहेत. पिंपरीतील ही जम्बो 1 एप्रिल पासून सुरु होणार आहे. रुग्णावाहिका कार्यन्वित रहातील, याची खबरदारी घ्या, असे पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. (Deputy Chief Minister ajit pawar)