खुशखबर..! मान्सून महाराष्ट्रात दाखल ; यलो अलर्ट जारी

मुंबई , गोव्यात अडकलेला मान्सून अखेर गुरुवारी 6 जून रोजी दुपारी 3 वाजता तळकोकण ओलांडून पुढे आला. दुपारी 4 पर्यंत रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर शहरे काबिज केली होती. आगामी काही तासांत तो पुणे,मुंबई (Pune, Mumbai) शहरात दाखल होईल असा अंदाज आहे. तर दुसरीकडे राज्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Monsoon enters Maharashtra ; Yellow Alert)

 

 

 

हवेचे दाब अनुकूल होताच मान्सून गुरुवारी 6 जून रोजी राज्यात दाखल झाला. रत्नागिरी, सोलापूर,कोल्हापूर, सतारा, सांंगली (Ratnagiri, Solapur, Kolhapur, Satara, Sangli) शहरात आला.तशी अधिकृत घोषणा हवामान विभागाने गुरुवारी दुपारी 4 वाजता केली.आगामी 12 ते 16 तासांत तो पुणे,मुंबई शहरात दाखल होईल असा अंदाज आहे.त्यामुळे संपूर्ण राज्याला येलो अलर्ट हवामान विभागाने दिला असून 7 ते 9 जून पर्यंत राज्यात मुसळधारेचा अंदाज दिला आहे. (Monsoon enters Maharashtra ; Yellow Alert)

MH Times Exclusive News । पुणे तिथे काय उणे ! 43 हजार मतदारांच्या मते एकही उमेदवार खासदारकीसाठी पात्र नव्हता म्हणून घेतला ‘हा’ निर्णय

 

हवामान विभागाने यंदा मान्सून राज्यात 5 जून रोजी येईल असा अंदाज वर्तवला होता. मात्र हवेचे दाब अनुकूल नसल्याने तो यंदा नियोजित तारखेपेक्षा एक दिवस उशीरा 6 जून रोजी आला. मागच्या वर्षीच्या तुलनेत दहा दिवस आधी आला आहे.गेल्या चार दिवसांत तो गोवा भागातून इंचभर पुढेही न सरकला नव्हता कारण हवेचे दाब राज्यात 1006 हेक्टा पास्कल होते.ते गुरुवारी दुपारी 1004 हेक्टा पास्कल इतके झाले त्यामुळे मान्सून ला अनुकूल वातावरण तयार होताच त्याने राज्यात प्रवेश केला.आता तो वेगाने पुणे, मुंबई शहरात काही तासांच्या आत दाखल होण्याची शक्यता असून संपूर्ण राज्यात 10 ते 14 दरम्यान दाखल होईल असा अंदाज आहे.

 

कोकण मध्ये 9 ते 12 जून तर मध्यमहाराष्ट्रात 10 जून ला अतिवृष्टी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकणात 7 व 8 जून, मध्यमहाराष्ट्रात 7 ते 11 जून , मराठवाड्यात 7 ते 9 जून तर विदर्भात 7 ते 9 जून दरम्यान मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

 

राज्यात येलो अलर्ट..

मान्सून गोव्यापर्यंत आल्याने राज्यात बाष्पयुक्त वार्यांचा वेग वाढला आहे. त्यामुळे 9 जून पर्यंत कोकण, मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आला आहे. या तीन दिवसांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Local ad 1