लोकसभा निवडणुकीचा निकाल किती वाजेपर्यंत लागेल ? जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितली निश्चित वेळ

पुणे : पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ (Pune, Baramati, Shirur and Maval) या ४ लोकसभेची मतमोजणी मंगळवार दिनांक ४ जून रोजी होणार असून मतमोजणीची सर्व प्रकिया पूर्ण झाल्यावर सकाळी ८ प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात होईल. तर निकाल दुपारी ३ वाजेपर्यंत लागेल अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सुहास दिवसे (Collector and District Election Returning Officer Dr. Suhas Diwase) यांनी दिली. (By what time will the result of the Lok Sabha election be announced?)

 

मतमोजणी संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी यांनी माहिती दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त स्मार्तना पाटील आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर (Additional Commissioner of Police Smartana Patil, Upazila Election Officer and Deputy Collector Meenal Kalaskar) उपस्थित होत्या.

जिल्हाधिकारी म्हणाले, पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील फुड कार्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) गोडाऊन, शिरूर ची मतमोजणी रांजणगाव एमआयडीसी तर मावळची मतमोजणी बालेवाडी स्टेडियम येथे होणार आहे.

 

मतमोजणीसाठी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा निहाय स्वतंत्र हॉल असणार आहेत. सुरुवातीस सकाळी ८ वाजता पोस्टल मतदान मोजले जाणार आहेत. पोस्टल मतमोजणी ११ वाजेपर्यंत संपेल आणि त्यानंतर ८. ३० वाजता ईव्हीएम मतमोजणीस सुरुवात होईल. तर दुपारी ३ वाजेपर्यंत निकाल जाहीर होईल. मतदान एकूण २० ते २१ फेऱ्यामध्ये संपेल अशी अपेक्षा आहे. मावळसाठी मतमोजणीच्या २५ फेऱ्या लागतील असे ही त्यांनी सांगितले.

 

जिल्हाधिकारी यांनी सांगतिले कि, पुण्यात २०१८ मतदान केंद्रे आहेत. तर मतमोजणीसाठी १०२ टेबल २१ फेऱ्या असणार आहेत. बारामती २५१६ मतदान केंद्रे, ११४ टेबल आणि २४ फेऱ्या, शिरूर २५०९ मतदार केंद्रे ,१०० टेबल आणि २८ फेऱ्या, तर मावळमध्ये २०६५ मतदार केंद्रे, १०८ टेबलवर २५ फेऱ्यात मतमोजणी पूर्ण होईल. अशाप्रकारे ४ लोकसभा मतदारसंघात ९६०९ मतदान केन्द्रे आहेत आणि ४२४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. मतमोजणीवर ३०० डिग्री कॅमेऱ्याने नजर ठेवली जाणार आहे.

 

ईव्हीएम मतमोजणीसाठी ४ ही लोकसभा मतदारसंघासाठी १८९६ आणि पोस्टल मतदान मोजणीसाठी १७४ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. लोकसभा निहाय ईव्हीएम आणि पोस्टल मतमोजणीसाठी नियुक्त केलेले कर्मचारी: पुणे ४९०, आणि ४५ , बारामती ४६९ आणि ४८, शिरूर ४८० आणि ५२ तर मावळ ४५७ आणि २९ कर्मचारी.

 

कुठे होणार मतमोजणी

मावळ – शिवछत्रपती क्रिडा संकुल बालेवाडी
पुणे – एफसीआय गोडाऊन कोरेगाव पार्क
बारामती – एफसीआय गोडाऊन कोरेगाव पार्क
शिरूर – राज्य वखार महामंडळ गोडाऊन रांजणगाव एमआयडीसी, शिरूर.

मतदार संघ – टेबल – फेरी

मावळ – 108 – 25
पुणे – 102 – 21
बारामती – 114 – 24
शिरूर – 100 – 28

 

Local ad 1