नागरिकांनी निबंधातून व्यक्त केला रोष ; युवक काँग्रेसने अपघातस्थळी निबंध स्पर्धा आयोजित मृतांना वाहिली श्रद्धांजली
पुणे : कल्याणीनगर भागात आठ दिवसांपूर्वी कार अपघातामध्ये तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला. या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या आरोपी अल्पवयीन मुलाला केवळ 300 शब्दांचा निबंध लिहण्याची अटीवर जामीन मिळाला होता. त्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला. आतापर्यंत या प्रकरणात आरोपिचे वडील विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) आणि चालकाला धमकावल्या प्रकरणी आजोबा सुरेंद्र अग्रवाल (Surendra Agarwal) यांच्यासह अन्य चार जणांना अटक करण्यात आली. (Citizens expressed their anger by writing essays on the Kalyani Nagar accident case)
अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि निषेध नोंदविण्यासाठी युवक काँग्रेसच्या (Pune Yulak Congress) वतीने रविवारी सकाळी घटनास्थळी माझी आवडती कार (my favorite car) (Porsche, Ferrari, Mercedes) दारूचे दुष्परिणाम, माझा बाप बिल्डर असता तर? मी खरच पोलीस अधिकारी झालो तर ? अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण ? असे विषय या निबंध स्परर्धा आयोजित केली होती. यामध्ये सुमारे 100 जण सहभागी झाले होते, निबंधातून स्पर्धकांनी आपला रोष व्यक्त केला आहे, अशी माहिती स्पर्धेचे समन्वयक चांगदेव गित्ते यांनी दिली.
११ हजार १११ रुपयाचे पहिल बक्षीस
३०० शब्दाचा निबंध लिहिणे,१५ दिवस येरवडा भागात वाहतुक नियमन करणे. व्यसनमुक्ती करीता समुपदेशन घेणे या अटीच्या आधारे अल्पवयीन मुलास जामीन देण्यात आला होता. त्यावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यावर, पुणे पोलिसांनी न्यायालयात पुन्हा अर्ज केल्यावर त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. या स्पर्धेला शहरातील विविध भागातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माझी आवडती कार (पोर्शे, फरारी, मर्सिडीज) दारूचे दुष्परिणाम, माझा बाप बिल्डर असता तर? मी खरच पोलीस अधिकारी झालो तर? अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण ? असे विषय या निबंध स्पर्धेत होते.तर ११ हजार १११ रुपयाचे पहिल बक्षीस ,१० हजार द्वितीय बक्षीस आणि ५ हजार तृतीय बक्षीस असे बक्षिस दिले जाणार आहे.
आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) म्हणाले की, कल्याणी नगर भागात आठ दिवसापूर्वी अपघाताची घटना घडली. ती अंत्यत दुर्दैवाची असून या प्रकरणातील सर्व आरोपींना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आहे. तसेच पुणे शहरात देशातील अनेक भागातून तरुण आणि तरुणाई शिक्षणासाठी येतात आणि ते पब मध्ये जातात. यामुळे शहरातील पब संस्कृतीला आळा घातला पाहिजे. हे काम राज्य उत्पादन शुल्क आणि पुणे पोलिसाच काम आहे. मात्र हे काम करताना कोणताही विभाग दिसत नाही. या अपघाताच्या घटनेनंतर कारवाईला सुरुवात केली आहे. पण अगोदरच कारवाई केली असती. तर हे निष्पाप तरुण आणि तरुणी वाचले असते,अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. तसेच ते पुढे म्हणाले की, त्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. त्याला तरुणांनी चांगला प्रतिसाद देत, त्यांच्या भावनांना निबंधमधून व्यक्त केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.