Porsche car accident । पोर्शे कार अपघातानंतर पुणे महापालिकेची बार आणि रुफ टॉप हॉटेलवर
बाणेर मधील एकूण 9 रुफ टॉप हॉटेलवर गुन्हा
Porsche car accident । पुणे. पोर्शे कार अपघातानंतर (Pune Porsche Accident) पुण्यातील बार आणि रुफ टॉप हॉटेलवर (Pune Pub and Bar) कारवाई केली आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत कल्याणीनगर, कोरेगाव पार्क, मुढवा, येरवडा, बाणेर (Kalyaninagar, Koregaon Park, Mudhwa, Yerawada, Baner) परिसरात केली. (Pune Municipal Corporation bar and roof top hotel after Porsche car accident)
शनिवारी बाणेर येथे रूफ टॉप हॉटेल,पत्राशेड व अनधिकृत बांधकाम यावर बांधकाम विकास विभाग झोन ३ यांचेमार्फत पोलीस स्टाफच्या मदतीने धडक कारवाई करण्यात आली.
या कारवाई मध्ये सुमारे 11 हजार 925 चौ.फूट क्षेत्र निष्कासित करण्यात आले आहे. हॉटेल इमेज रेस्टोबार आणि आइस अँड फायर बाणेर हायवे लगत आणि हॉटेल हाईव्ह रांका ज्वेलर्सच्यावर कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पुणे महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता श्रीधर येवलेकर, कार्यकारी अभियंता जयवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली
उप अभियंता प्रकाश पवार, कनिष्ठ अभियंता अजित सणस, संदीप चाबुकस्वार, केतन जाधव व स्टाफ, सहा पोलिस यांच्या पथकाने एक जेसीबी, दोन गॅस कटर, एक ब्रेकर दहा अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने कारवाई केली.
बाणेर मधील एकूण 9 रुफ टॉप हॉटेलवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याव्यतिरिक्त दोन हॉटेल वर गुन्हा दाखल करणेसाठी तक्रार देण्यात आली आहे.