Maratha Reservation Survey । मराठा समाजासह खुल्या प्रवर्गाचे आजपासून सर्वेक्षण

Maratha Reservation Survey : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाला (Maratha Reservation Survey) आजपासून राज्यातील सर्वच जिल्ह्यात प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.

Maratha Reservation Survey : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाला (Maratha Reservation Survey) आजपासून राज्यातील सर्वच जिल्ह्यात प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. 100 कुटुंबामागे एक प्रगणकाची नियुक्ती करण्यात आली आहे. (Maratha Reservation. Survey of open category including Maratha community from today)

 

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार गोखले इन्स्टिट्यूटने (Gokhale Institute) तयार केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये सुमारे 154 प्रश्न असून, या सर्वांची उत्तरे संबंधित कुटुंबाकडून भरून घेतली जाणार आहेत. 31 जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याची वेळ प्रशासनाने दिली.

 

राज्य मागासवर्ग आयोगामार्फत होत असलेल्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासले जात आहे. सर्वेक्षणासाठी नेमण्यात आलेले प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सर्वेक्षण अचूक आणि परिपूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. सर्वेक्षणासाठी घरी येणाऱ्या प्रगणकांना नागरिकांनी आवश्यक माहिती देवून सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहेत.

 

 

राज्‍य मागासवर्ग आयोगाने निश्चित केलेल्‍या निकषानुसार सर्वेक्षणाचे काम युध्‍द पातळीवर पुर्ण करणे बाबत शासनाने निर्देश दिले आहेत. या सर्वेक्षणाच्‍या कामासाठी जिल्‍हास्‍तरावर जिल्‍हाधिकारी व महापालीका आयुक्‍त (District Magistrate, Municipal Commissioner) यांना नोडल अधिकारी म्‍हणून प्राधिकृत करण्‍यात आले आहे.

 

Local ad 1