Pune International Film Festival 2024। ‘अ ब्रायटर टुमारो’ चित्रपटाने ‘पीफ’ महोत्सवाची सुरुवात होणार

pune international film festival 2024 । पुणे : ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (पीफ)महोत्सव २०२४’चा उद्घाटन सोहळा गणेश कला क्रीडा मंच (Ganesh Kala Krida Manch) येथे १८ जानेवारीला संध्याकाळी ५ वाजता होणार

pune international film festival 2024 । पुणे : ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (पीफ)महोत्सव २०२४’चा उद्घाटन सोहळा गणेश कला क्रीडा मंच (Ganesh Kala Krida Manch) येथे १८ जानेवारीला संध्याकाळी ५ वाजता होणार असून, यावेळी भारतीयचित्रपटसृष्टीतील योगदाना बद्दल प्रसिद्ध रेडियो उद्घोषक अमिन सयानी (Radio announcer Amin Sayani), दिग्दर्शक-अभिनेते गौतम घोष आणि प्रसिद्धनृत्यांगना-अभिनेत्री लीला गांधी यांना ‘पीफ डिस्टिंग्विश अॅवार्ड’, तर संगीत संयोजक, गायक आणि गीतकार एम. एम. कीरवानी यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी संगीतकार एस. डी. बर्मन पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा, महोत्सवाचे संचालक डॉ, जब्बार पटेल यांनी केली. (movie ‘A Brighter Tomorrow’ will start the ‘Piff’ festival)

 

उद्घाटन सोहळ्यानंतर ‘अ ब्रायटर टुमारो’ (इटली, दिग्दर्शक – नानी मोरेत्ती) हा उद्घाटनाचा चित्रपट (ओपनिंगफिल्म) दाखवण्यात येणार आहे, तर‘कीडनॅप्ड’ (इटली, दिग्दर्शक – मार्कोबेलोचिओ) या चित्रपटाने महोत्सवाची (क्लोजिंग फिल्म) सांगता होणार असल्याचे डॉ.पटेल यांनी सांगितले. हे वर्ष सदाबहार अभिनेते देव आनंद (२६ सप्टेंबर १९२३), गायक मुकेश (२२ जुलै १९२३), दिग्दर्शक मृणाल सेन (१४ मे १९२३), प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक एनटीआर (२८ मे १९२३), संगीत दिग्दर्शक सलिल चौधरी  (१९ नोव्हेंबर १९२३) आणि गीतकार शैलेन्द्र (३०ऑगस्ट १९२३) यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात येणार असल्याचे  डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले. यावेळी महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय ज्यूरी च्या नावाचीही घोषणा करण्यात आली.

 

यामध्ये पेट्र झेलेन्का – (झेक प्रजासत्ताक – नाटककार आणि दिग्दर्शक), शाई गोल्डमन (इस्रायल – सिनेमॅटोग्राफर आणि चित्रपटनिर्माता),सुधीर मिश्रा (भारत – चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक), मंजू बोराह (भारत – चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक), सेतारेह इस्कंदरी (इराण – अभिनेत्री), उमरान सफ्तेर (तुर्कस्तान – चित्रपट दिग्दर्शक आणिनिर्माता), सू प्राडो (फिलिपाईन्स – अभिनेत्री) आणि विसाकेसाचंद्रसेकरम (श्रीलंका – चित्रपट दिग्दर्शक, लेखक, नाटककार) यांचा समावेश आहे.

 

 

या महोत्सवात विकास खार्गे, अविनाश ढाकणे, जानू बरुआ, शाई गोल्डमन, मनोज वाजपेयी यांचे विविध विषयांवर मास्टर क्लास होणारआहेत. ‘नव्या मराठी सिनेमाच्या शोधात’ या विषयावर परिसंवाद होणार असून, त्यामध्ये निखिल महाजन, वरून नार्वेकर, रितेश देशमुख, मंगेश देसाई आणि संजय कृष्णाजी पाटील सहभागी होणार आहेत. तसेच चित्रपट महोत्सवांचे भविष्य आणिमहत्त्व या विषयावरील परिसंवादामध्ये सैबल चटर्जी, बीना पॉल, एडवीनासपुकास्ता सहभागी होणार असल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले. १८ ते २५ जानेवारी दरम्यान ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (पीफ) महोत्सव २०२४’होणार आहे. सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन (६स्क्रीन), कॅम्प परिसरातील आयनॉक्स (३ स्क्रीन) आणि औंध भागातील वेस्टएंडमॉलमधील सिनेपोलीस चित्रपट गृहात (२ स्क्रीन) या तीन ठिकाणी एकूण ११ स्क्रीनवरचित्रपट दाखविले जाणार आहेत. महोत्सवासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया www.piffindia.com या महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू झाली असून, चित्रपटगृहांवर स्पॉट रजिस्ट्रेशन प्रक्रियाही सुरू झालीआहे. रसिक प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण महोत्सवासाठीनोंदणी शुल्क रुपये ८०० फक्त आहे.

 

पुरस्काराचे मानकरी अमीन सयानीअमीन सयानी हे भारतातील लोकप्रिय माजी रेडिओ उद्घोषक आहेत. रेडिओ सिलोनवर‘बिनाका गीतमाला सादर करीत अमीन सयानी यांनी संपूर्ण भारतीय उपखंडात प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवली. पारंपरिक “भाईयो और बहनो”च्या विरूद्ध “बहनोंऔर भाइयों” प्रेक्षकांना संबोधित करण्याची त्यांची शैली अजूनही लोकप्रिय मानलीजाते. त्यांनी १९५१ पासून ५४ हजारांहून अधिक रेडिओ कार्यक्रम आणि १९ हजारजिंगल्सची निर्मिती केली आहे. सीबाका/ बिनाका त्यांनी अगोदर रेडिओ सिलोनवर आणि नंतर विविध भारतीवरून एकूण ४२वर्षांहून अधिक काळ प्रसारीत केले आणि ऑल इंडिया रेडिओ लोकप्रिय करण्यात मदत केली.

 

महात्मा गांधींच्या सूचनेनुसार सुरू झालेले ‘राहबर’ या पाक्षिकाचे संपादन, प्रकाशन आणि छापण्यात सयानी यांनी त्यांची आई कुलसुम सयानीयांना मदत केली होती. गौतम घोषअनेक राष्ट्रीय पुरस्कार नावावर असणारे गौतम घोष हे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, संगीत दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर आहेत. त्यांनी प्रामुख्याने बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना १९९७ मध्ये इटलीतील “व्हिटोरियो डी सिका” हापुरस्कार मिळाला असून, हा पुरस्कार प्राप्तकरणारे ते एकमेव भारतीय आहेत. २०१२ मध्ये, पश्चिम बंगाल सरकारने त्यांना ‘बंग बिभूषण’ देऊन सन्मानित केले आहे.

 

चित्रपटातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन, त्यांना जुलै २००६ मध्ये ‘स्टार ऑफ द इटालियन सॉलिडॅरिटीनाइटहूड’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. लीला गांधी१९५१ साली नृत्य दिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरू केलेल्या लीला गांधी यांनीपुढे मास्टर भगवान यांच्या ‘रंगीला’ (१९५३), ‘हल्लागुल्ला’ (१९५४) व ‘भला आदमी’ (१९५८) या चित्रपटांतनृत्य करत पदार्पण केले. ‘बस कंडक्टर’ या चित्रपटात तर त्यांनी हेलनबरोबर नृत्यकेले होते. राजा ठाकूर यांच्या ‘रेशमाच्या गाठी’ या कार्यक्रमात ‘इष्काच्या रंगातवीज भरे अंगात’ या गाण्यावर त्यांनी नृत्य केले होते. त्यानंतर ‘प्रीतिसंगम’(१९५७)मधील त्यांचे नृत्य गाजले.‘सांगत्ये ऐका’पासून (१९५९) त्यांनी अनेक चित्रपटांचेनृत्यदिग्दर्शन केले, तर ‘केला इशारा जाताजाता’ (१९६५) या चित्रपटाच्या त्या सहनायिका होत्या. चित्रपटाबरोबरच त्यांचानाट्यप्रवास ही चालू होता. ७५ चित्रपटात व २५ नाटकांत त्यांनी काम केले आहे. एम. एम कीरवानीपद्मश्री कोडुरी मारकथमणी किरवानी हे एम. एम. कीरवानी म्हणून प्रसिद्ध आहेत.

 

संगीत संयोजक, रेकॉर्ड निर्माते, गायक आणि गीतकार अशा अनेक भूमिकांमध्ये त्यांचे काम आहे. त्यांनी प्रामुख्याने तेलुगू चित्रपटात काम केले आहे. कीरवानी यांनी हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांसाठीही काम केले. क्षाना क्षणम, घराना मोगुडू, अल्लारी प्रियुडू, क्रिमिनल, सुभा संकल्पम, पेल्ली संदादी, देवरागम यांसारख्या रचनांसाठी ते प्रसिद्ध आहेत. तसेच अन्नमय्या (१९९७), जख्म (१९९८), स्टुडंट नंबर१ (२००१),जिस्म (२००३), पहेली (२००५), मगधीरा (२००९), बाहुबली (२०१५), आणि आरआरआर (२०२२), हे त्यांचेगाजलेले चित्रपट आहेत. त्यांच्या बहुतेक रचना एस. पी. बालसुब्रमण्यम आणि के. एस.चित्रा यांनी जिवंत केल्या आहेत. त्यांना ११ नंदी पुरस्कार, ८ फिल्मफेअर पुरस्कार,२ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, एक अकादमी (ऑस्कर) पुरस्कार, एक गोल्डन ग्लोब पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. २०२३ मध्ये, भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले आहे.

Local ad 1