पुणे रिंगरोडची मोठी बातमी ! संपादित जमिनीचा ताबा एमएसआरडीसीला कधी मिळणार !
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (Maharashtra State Road Development Corporation) प्रकल्प असलेल्या वर्तुळाकार रस्त्याच्या (रिंग रोड) भूसंपादनाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यानुसार पश्चिम मार्गावरील ३२ गावांमधील ६३१ हेक्टर (१५६० एकर) जागेपैकी ३४३ हेक्टर (८५० एकर) म्हणजे ६५ टक्के जागा ताब्यात आली आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (Maharashtra State Road Development Corporation) प्रकल्प असलेल्या वर्तुळाकार रस्त्याच्या (रिंग रोड) भूसंपादनाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यानुसार पश्चिम मार्गावरील ३२ गावांमधील १५६० एकर जागेपैकी ८५० एकर म्हणजे ६५ टक्के जागा ताब्यात आली आहे. जानेवारी अखेरपर्यंत उर्वरीत संपूर्ण १५६० एकर जागेचा ताबा एमएसआरडीसीकडे हस्तांतरीत केले जाणार आहे. (Big news of Pune Ring Road ! When will MSRDC get possession of the acquired land !)
राज्य सरकारतर्फे जिल्हा प्रशासनाला भूसंपादनासाठी १७०० कोटी रुपये देण्यात आले असून १५०० कोटी रुपयांचे वाटण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरीत भूसंपादनासाठी जिल्हा प्रसासनाकडे ३०० कोटी रुपये शिल्लक असून नव्याने १ हजार कोटींची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
‘पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरातील वाहतूककोंडी सोडविण्याच्या दृष्टीने एमएसआरडीसीकडून प्रकल्प हाती घेतला आहे. पश्चिम आणि पूर्व अशा दोन टप्प्यांत प्रकल्प करण्यात येणार असून, पश्चिम मार्गावरील जमिनीचे ६५ टक्के भूसंपादन झाले आहे, तर पूर्व मार्गावर असणाऱ्या गावांमधील स्थानिकांना नोटीस देऊन भूसंपादनाची कार्यवाही देखील वेगाने सुरू करण्यात आली आहे. पश्चिम मार्गावरील रिंगरोडची रचना बदलल्याने तीन गावांची भूसंपादन प्रक्रिया प्रलंबित राहीली होती. त्याबाबतही कार्यवाही करण्यात आली आहे.
रिंगरोडसाठी पश्चिम मार्गावरील सुमारे ६३१ हेक्टरचे निवाडे जाहीर करण्यात आले आहेत. त्यापैकी संमतीने २६० हेक्टर, तर सक्तीने ३७० हेक्टर क्षेत्राचे सक्तीने निवाडे जाहीर करून भूसंपादन करण्यात आले आहे. पूर्वेकडील ४६ गावांमधील बाधितांना भूसंपादनाच्या नोटीस देण्यात आल्या आली आहे.