Extension of time to apply । मिनी ट्रॅक्टरसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, कोणाला मिळतो जाणून घ्या
Extension of time to apply । नांदेड : अनुसूचित जाती व नवबौध्द (Scheduled Castes, Neo-Buddhists) घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याबाबतची योजना शासनाने सुरु केली असून शासन निर्णयान्वये योजनेच्या अटी व शर्ती निश्चित केलेल्या आहेत. (Extension of time to apply for mini tractor, know who gets it)

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणे या योजनेचे प्रस्ताव सादर करण्यासाठी 10 जानेवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. (Mini Tractor Anudan Yojana Maharashtra)
या योजनेंतर्गत इच्छूक लाभार्थ्यांचे प्रस्ताव विहित नमुन्यात व शासन निर्णयातील अटी, शर्तींची पूर्तता करुन घेऊन पात्र बचतगटांना या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यास 29 डिसेंबर 2023 ही शेवटची तारीख दिली होती. परंतु विविध संघटनांनी दिलेली तारीख पुन्हा वाढवून मिळण्याबाबत विनंती केल्याने 10 जानेवारी 2024 पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे, असे समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे (Social Welfare Assistant Commissioner Shivanand Mingire) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.