ZP Teachers Bharti 2024 update news । राज्यातील जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळांमधील रिक्त असलेल्या शिक्षकांची भरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या आठवडाभरात सर्व जिल्हा परिषदांकडून शिक्षक भरतीची (Shikshak Bharti 2024) जाहीरात प्रसिद्ध होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. जर तुम्ही शिक्षक पदासाठी अर्ज करण्यास पात्र असाल तर लगेच तयारीला लागा. (ZP Teachers Bharti 2024. Teacher recruitment advertisement will be released)
राज्यात गेल्या काही वर्षांपासून शिक्षक भरतीची (Maharashtra Shikshak Bharti 2024) चर्चा सुरु असून, त्याला मुहूर्त मिळत नव्हते. राज्यकर्ते आम्ही लवकरच भरती करणार असेल छातीठोकपणे सांगत होते. मात्र, भरतीची तारीख जाहीर करत नव्हते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी भराती प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे. शिक्षक भरतीची जाहिरात (Maharashtra Teacher Recruitment 2024) येत्या काही दिवसांत प्रसिद्ध होईल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
MH Times Exclusive News । नांदेड-पुणे एक्सप्रेस रेल्वेला क्रासिंगसाठी जागो-जागी रेड सिग्नल
राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधीव तब्बल 30 हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. तर खासगी अनुदानित संस्थांमधील सुमारे 20 हजार पदे रिक्त आहेत. या रिक्त असलेल्या पदांपैकी 80 टक्के पदे भरली जाणार असून, त्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. शिक्षकांच्या रोस्टरवर काही आमदारांनी अक्षेप घेतला आहे. त्यामुळे रिक्त असलेल्या जागांपैकी 10 टक्के जागा मागे ठेवून 70 टक्के जागांसाठी जाहिराती प्रसिद्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.