Police Patil Bharti 2023 नांदेड जिल्ह्यात पोलिस पाटीलच्या 829 पदांसाठी होणार भरती ?

Police Patil Bharti 2023 नांदेड जिल्ह्यातील 829 पोलिस पाटिल पदे रिक्त असून, त्याठिकाणचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

Police Patil Bharti 2023 नांदेड  : नांदेड जिल्ह्यातील 829 पोलिस पाटिल पदे रिक्त असून, त्याठिकाणचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार ठरवून दिलेल्या कालबद्ध कार्यक्रम सुधारीत करुन 28 डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना पोलिस लेखी पत्र देऊन आदेश दिले आहेत. त्यामुळे रिक्त असलेल्या ठिकाणी लवकरच पोलिस पाटिल पदांची भरती होण्याची शक्यता आहे.

 

Police Patil Bharti 2024 । पोलिस पाटील पदासाठी अर्ज कोण ठरु शकतो?, कर्तव्य आणि मानधन किती मिळतो ?

नांदेड जिल्ह्यातील उपविभाग निहाय रिक्त असलेली पोलिस पाटील पदांचे (पेसा अंतर्गत पदे वगळता) आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. नांदेड उपविभागामध्ये 85 पदे रिक्त असून, 29 खुल्या प्रवर्गासाठी असणार आहेत. तर उर्वरित पदे ही विविध प्रवर्गांसाठी आरक्षित आहेत. (police patil bharti 2023 police patil bharti पोलीस पाटील भरती २०२३)

 

सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा..

पोलीस पाटील भरती 2023

 

कंधार उपविभागात 168 पदे असून, त्यातील 59 पदे खुल्या प्रवर्गासाठी आहेत. बिलोली मध्ये 100 पदे असून, त्यातील 31 पदे खुल्या प्रवर्गासाठी आहेत. धर्माबाद विभागात 71, देगलूर 151, भोकर 86, हदगाव 101 तर किनवटमध्ये 67 पदे रिक्त आहेत.

Police Patil Bharti 2024 । पोलीस पाटील पदाला शासनाने मान्यता कधी दिली ? When was the post of Police Pail approved?

 

महिलांसाठी 30 टक्के जागा आरक्षित

रिक्त असलेल्या 829 पदांपैकी 30 टक्के जागांवर महिलांना संधी मिळणार आहे. त्यामुळे आता गावांतील पोलिस पाटील म्हणून महिला काम पहाणार आहे.

 

 

इंग्रजांच्या काळात गाव पातळीवरील कायदा व सुव्यवस्था व महसूल यावर देखरेखीचे काम पाटील यांच्याकडेच होते. ब्रिटिश काळात मुंबई ग्राम पोलीस अधिनियम 1867 (Bombay Village Police Act 1867) अंमलात आणला गेला, त्या कायद्याच्या तरतुदीनुसार पोलीस पाटील हे पद परंपरेने पुढे आले. मात्र, 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाल्यावर ब्रिटिशांनी नेमलेली वंशपरंपरागत पदे महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1962 पासून रद्द करण्यात आली.

पोलिस पाटील कोणाच्या आदेशाने काम करतात ? Police Patil works under whose order?

17 डिसेंबर 1967 महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार प्रत्येक महसुली गावांना पोलीस पाटील नेमण्यात आले. त्यांचा उपयोग गावपातळीवर महसूल व पोलीस प्रशासनाला नियमित होत गेला. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 (Maharashtra Village Police Act, 1967) अधिनियम 86 नुसार पोलीस पाटील गाव पातळीवर कार्यकारी दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये काम करतात.

पोलिस पाटलांची काय आहेत कर्तव्य ? What are the duties of Police Patil?

तालुका कार्यकारी दंडाधिकारी गावातील जी माहिती मागवतील ती पुरवणे, गावातील गुन्ह्यांचे प्रमाण व समाज स्वास्थाची माहिती कळवणे, पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देणे, सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचणार नाही यासाठी आवश्यक माहिती अधिकाऱ्यांना वेळोवळी देणे, गावपातळीवर किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रातील गुन्ह्याची माहिती पोलीस ठाण्यास देणे, नैसर्गिक आपत्ती व रोगराई या गोष्टींचा अहवाल वरिष्ठांना देणे. गावात अनैसर्गिक किंवा संशयास्पद मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना देणे.

 

गावातील सण, उत्सव, यात्रा, राजकारण, निवडणुका या सर्वच घडामोडीवर पोलीस पाटील लक्ष ठेवून असतात. ग्रामपंचायत व वेगवेगळ्या निवडणुकांच्या काळात पोलीस पाटील गावपातळीवरील हालचालींबाबत पोलीस प्रशासनाला माहीती उपलब्ध करून देत असतो.

 

Local ad 1