नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पहाटे पाच वाजेपर्यंत मद्यपींचा चालणार झिंगाट…

मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तरुणाई सज्ज होत असून, यातील बहुतांश जण एकच प्याला म्हणत दारूचे प्याले रिचवतात. अशांना राज्य शासनाने मोठी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही म्हणाल दारुचे दर कमी केले की काय ? तसे काही नाही.. घाबरु नका. मात्र, रात्री एक वाजेपर्यंत मद्य खरेदी करता येईल. तर पहाटे पाच वाजेपर्यंत पेग रिचवता येणार आहेत. त्यामुळे आहे की नाही गिफ्ट… ( Liquor shops open to welcome the New Year)

 

राज्यभरात सध्या नव्या वर्षाच्या आगमनाचा उत्साह असून, दुसरीकडे ख्रिसमसच्या (Christmas) सुट्टीच्या निमित्ताने अनेकजण फिरायला जाण्याचा बेत अखत आहेत.  ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्य सरकारने मद्यप्रेमींना खूश करणारा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीला मद्यप्रेमींना खूश ठेवण्यासाठी, तसेच ऐन पार्टीच्या वेळी मद्यप्रेमींची गैरसोय होऊ नये यासाठी मद्यविक्रीचे दुकांने रात्री उशिरीपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात 24, 25 आणि 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 1 वाजेपर्यंत दारूचे दुकाने खुले ठेवण्यात येणार आहेत.

 

महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे कलम 139 (1) (C) आणि कलम 143) (2) (H) (4) अन्वये नाताळ आणि नववर्षानिमित्त 24, 25 आणि 31 डिसेंबरला राज्यातील विविध मद्य दुकानं निर्धारित वेळेनंतर रात्री उशिरापर्यंत उघडे ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या आदेशानुसार, विदेशी मद्य विकणारे किरकोळ विक्रीचे दुकान, उच्च दर्जाची आणि अतिउच्च दर्जाची श्रेणीवाढ मिळालेली एफएल -2 अनुज्ञप्ती, तसेच एफएळडब्ल्यू-2 प्रकारच्या दारुच्या विक्रेत्यांना रात्री उशिरापर्यंत दारु विक्रीस मान्यता दिली आहे.

बीअर बार आणि क्लब पहाटे 5 वाजेपर्यंत खुले असणार

बीअर बारला रात्री 12 वाजेपासून पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असेल. विशेष म्हणजे क्लबला देखील रात्री मुभा असेल. क्लबसाठी पोलीस आयुक्तांच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त रात्री 11.30 ते पहाटे 5 वाजेपर्यंत मुभा राहील. तर पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी रात्री दीड ते पहाटे पाच वाजेपर्यंत चालू ठेवण्यास मुभा राहील.

रात्री एक वजेपर्यंत कोणती दुकाने सुरु असतील..

विदेशी मद्य विकणाऱ्या किरकोळ विक्रीच्या दुकानास रात्री साडेदहा ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत दुकान खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर उच्च दर्जाची किंवा अति उच्च दर्जाची श्रेणीवाढ मिळाळेल्या दारुच्या दुकानांना रात्री साडे अकरा ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. एफएलडब्ल्यू-2 प्रकारच्या मद्यविक्रेत्यांसाठी रात्री साडेदहा ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत दुकान सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. ( Liquor shops open to welcome the New Year)

 

हे ही वाचा :

Nanded Excise Action News । हॉटेल, खानावळ, ढाब्यावर दारु ढोसणाऱ्यांना उत्पादन शुल्कचा दणका 

Pune Election News 2024 । हजर होण्यास टाळाटाळ करणाऱ्या बीएलओंवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा

वृत्तपत्र आणि नियतकालिके नोंदणी विधेयक लोकसभेत मंजूर ; काय आहेत नवीन तरतुदी

 

 

Local ad 1