पुणे : मराठा आरक्षणावरुन राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच मराठा आरक्षण न देण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Nationalist Congress Party President Sharad Pawar) हेच जबाबदार असल्याचा आरोप प्रा. नामदेव जाधव यांनी केला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रा. जाधव यांना काळे फासण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार शनिवारी सायंकाळी नवी पेठेतील पत्रकार संघाबाहेबर नामदेव यांना काळे फासले आहे. (NCP activists Prof. Namdev Jadhav blacked out (Video)
शरद पवार यांच्या जात प्रमाणपत्रावर कुणबी नोंद (Kunbi entry on caste certificate) असल्याचा दावा प्रा. जाधव यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्याविरोधात वक्तव्य केले होते.त्यांच्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पुण्यात काळे फासले आहे.
नामदेव जाधव यांचा आज भंडारकर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रम होणार होता. पण भंडारकर इन्स्टिट्यूटने ती परवानगी नाकारली. कायदा आणि सुव्यवस्थेचा कारण देत कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर नामदेव जाधव प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी पत्रकार भवनासमोर आले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पत्रकार भवनसमोर जमले. त्यावेळी नामदेव जाधव बोलत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर काळे फासले आहे.
पुण्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Pune NCP City President Prashant Jagtap) यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे. “होय, आम्ही नामदेव जाधव यांना काळे फासले आहे. या नामदेव जाधवांना विक्रोळी पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्याखाली अटक झालेली होती. एका शाळेत पैसे घेवून मुलांचे गुणवाढल्याप्रकरणी त्याची हकालपट्टी करण्यात आली होती. आणि आज तो व्यक्ती शरद पवार यांच्यावर टीका करतोय”, असे प्रशांत जगताप म्हणाले.
लोकशाहीमध्ये टीका करण्याचा अधिकार आहे. पण तो खऱ्या पुराव्यावर करावी. शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात 60 वर्षांपासून जास्त कालावधीपासून आहेत. त्यांच्यावर नाहक खोटे आरोप केले जातात. हे आरोप होत असताना पुरावे सादर केले जात नव्हते. पुरावे असते तर निश्चित टीका करावी. आम्ही आठ दिवसांचा कालावधी दिला होता. आम्ही त्यांना इशारा देवूनही ती भाषा थांबवली नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासवल, अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिली.
प्रा.नामदेव जाधव यांच्या पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटमधील (Bhandarkar Institute) कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, तरीही या ठिकाणी येणार असल्याचे कळल्यानंतर राष्ट्रवादीने या ठिकाणी जोरदार आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीकडून जाधव यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतरही जाधव यांनी या ठिकाणी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आले.
हल्ला झाल्यानंतर नामदेव जाधव यांनी एका व्हिडीओद्वारे आपली भूमिका मांडली. तसेच या हल्ल्यावरून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध नोंदवला. पुण्यात मराठा आरक्षणाची भूमिका मांडत असताना माझ्यावर हल्ला झाला. मराठा आरक्षणाचे मारेकरी शरद पवार असल्याचे कागदपत्र माझी हाती लागले होते. ते वास्तव असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ते पटलं नाही. त्यामुळेच माझ्यावर हल्ला करण्यात आला, असे प्रा. जाधव यांनी सांगितले.