पुण्यात ७९० ग्रॅम वजनाच्या बाळाने दिली मृत्यूशी झुंज !

पुणे : अंकुरा हॉस्पिटलमध्ये (Ankura Hospital) २५ आठवड्यांच्या आणि केवळ ७९०  ग्रॅम वजनाच्या बाळाला जीवनदान देण्यात आले आहे. अकाली जन्म झाल्याने पुर्णतः विकास न झालेल्या या बाळाचे फुफ्फुस (lungs)कमकुवत होते, तसेच मेंदूतील रक्तस्त्राव आणि जन्मजात हृदय दोष (Patent ductus arteriosus) यासारख्या अनेक गुंतागुंत असलेल्या या बाळाला वाचविण्यात डॅाक्टरांना यश आले आहे. (A baby weighing 790 grams fought with death in Pune!)

 

अंकुरा हॉस्पिटलचे डॉ. उमेश वैद्य, डॉ.सिद्धार्थ एम आणि डॉ. अनुषा राव (Ankura Hospital Dr. Umesh Vaidya, Dr. Siddharth M, Dr. Anusha Rao)यांच्या टिमने बाळावर उपचार केले आहे.

 

 

जन्मतः गुंतागुंत असूनही त्या सर्वांचे अचूक व्यवस्थापन करत र्भधारणेच्या ३८ आठवड्यांनंतर बाळाला घरी सोडण्यात आले. त्यावेळी त्या बाळाचे वजन १.८२५ किलो होते. सध्या हे बाळ त्याच्या वयानुसार विकासाचे टप्पे यशस्वीरित्या गाठत असून जन्मानंतरच्या अवघ्या ५ महिन्यांत त्याचे वजन ३.३२ किलो पर्यंत पोहोचले आहे.

 

पुण्यात राहणाऱ्या राहुल लुपाने आणि प्रियांका लुपाने या जोडप्याला जेव्हा ते आई बाबा होणार हे समजले तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला. मात्र, दुर्दैवाने त्यांचा आनंद अल्पकाळ टिकला कारण २५ आठवड्यांच्या गर्भावस्थेत बाळ ७९० ग्रॅम कमी वजनाच्या बाळाने जन्म घेतला.

 

निओनॅटोलॉजी विभागाचे प्रमुखडॉ. उमेश वैद्य म्हणाले, जन्मानंतर  बाळाला एनआयसीयू मध्ये आय व्ही फ्लुइड्स, पॅरेंटरल न्यूट्रिशन आणि अँटीबायोटिक्स देण्यात आले. बाळाला ३६ आठवड्यांपर्यंत श्वसनक्रिया सुरळीत राहण्याकरिता प्रयत्न करावे लागणार होते तसेच बाळाला ऑक्सिजनची ही आवश्यकता होती.

 

डॉ. अनुषा राव यांच्या मते, बाळाला जन्मानंतरच्या पहिल्या दिवसापासून टोटल पॅरेंटरल न्यूट्रिशन (TPN) ने सुरुवात केली होती. हळूहळू स्तनपानास सुरुवात करण्यात आली. बाळाला नियमित स्तनपान, योग्य देखभाल, तेल मसाज, पुरेसा सूर्यप्रकाश, आणि श्रवण आणि दृष्टी संबंधीत विकासासाठी प्रयत्न करण्यात आला. वैद्यकीय उपचार तसेच मानसिक आधारामुळे अकाली जन्मलेल्या अर्भकांचे जीवन सुरक्षित होते.

 

कन्सल्टंट निओनॅटोलॉजिस्ट  डॉ.सिद्धार्थ मदभुशी म्हणाले, बाळाचे ताबडतोब व्यवस्थापन न केल्यास दीर्घकालीन न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरर्स, दृष्टीदोष आणि श्रवण समस्या यासारख्या इतर गुंतागुंत होऊ शकतात, ज्या अकाली जन्मलेल्या बाळामध्ये सामान्यपणे आढळून येतात. सुसज्ज एनआयसीयुद्वारे कमी वजनाच्या बाळांना काळजी घेण्याकरिता,  उच्च दर्जाच्या सुविधा पुरवण्यासाठी तसेच अशा बाळांकरिता पोषक वातावरण तयार करण्यासाठी सक्षम आहोत आणि तसेच याठिकाणी उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक सेवासुविधा अतिशय फायदेशीर ठरतात.

 

 

डॉ.सिद्धार्थ  म्हणाले, ‘डब्ल्यूएचओ’ने सादर केलेल्या अहवालानुसार दरवर्षी अंदाजे १५ दशलक्ष बाळ अकाली जन्माला येतात, म्हणजे दहा पैकी एका बाळाचा अकाली जन्म होतो. यापैकी, भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असल्याने, भारतात मुदतपूर्व प्रसुतीचे प्रमाण २० टक्के आहे, तर एक दशलक्ष अकाली जन्मलेल्या बाळांचा मृत्यू होतो.

 

अकाली जन्मलेल्या मुलांमधील आजार, समस्या आणि अशा मुलांची काळजी घेण्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींबद्दल लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने दरवर्षी १७ नोव्हेंबर रोजी जागतिक प्रीमॅच्युरिटी डे म्हणून पाळला जातो. (world prematurity day). जास्तीत जास्त अकाली जन्मलेल्या बाळांना रोगमुक्त आणि सुरक्षित जीवन मिळावे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. गर्भधारणेच्या २३ ते २६ आठवड्यांच्या कालावधीत जन्मलेल्या बाळाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. बाळाच्या शरीरातील अवयव प्रणाली पूर्णपणे विकसित न झाल्यामुळे ते कमकुवत असतात आणि मातेच्या गर्भाबाहेर जगण्यासाठी त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते .

 

Local ad 1