Sagar Utsav in Pune । पुणे : पुण्यात दिवाळी पाडवा आणि भाऊ बीजच्या दिवशी ‘सगर उत्सव’ साजरा केला जातो. ‘सगर उत्सव’ (Sagar Utsav in Pune) म्हणजे काय हा प्रश्न पडाल असेल. कारण हा उत्सव पुण्यासह आहमदनगर, सोलापूर जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यात साजरा केला जातो. देशातील इतर राज्यात साजरा केला जाते, असे जाणाकार सांगतात. (Celebrating ‘Sagar Utsav’ in Pune)
वीरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे (Veerashaiva Lingayat Gawli Samaj) ‘सगर उत्सव’ अर्थात गोवर्धन पूजनाची परंपरा आजही कायम आहे. दर वर्षी दीपावली पाडवा व बलिप्रतिपदेनिमित्त मुक्या प्राण्यांचा सगर उत्सव साजरा केला जाते. पुण्यात गवळी समाजाच्या वतीने सगर उत्सव साजरा करण्यात आला. दिवाळी पाडव्याला एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी समाजबांधव एकत्र येतात. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सगर अर्थात रेड्यांची मिरवणूक काढण्यात आली.
गवळी समाज बांधव आपापल्या म्हशी आणि रेड्यांच्या शिंगांना मोरपिसे व झेंडूच्या माळा लावून त्यांच्या अंगावर रंगीबेरंगी झुली कोरून सजवितात. कॅम्प भागातील गवळी वाडा येथे लिंगायत गवळी समाज आणि पुणे शहरातील गणेश पेठ येथेही लिंगायत गवळी समाज बांधवांनी म्हैस आणि रेड्यांची मिरवणूक काढली. त्यामध्ये 100 पेक्षा अधिक म्हैस आणि रेडे सहभागी झाले होते.
म्हणून गवळी समाजबांधव दीपावली सणाच्या आनंदोत्सवात सहभागी होतात. आगामी काळात आणि नववर्षात राज्यासह देशात आणि समाजात कुठलेही अघटित संकट येऊ नये म्हणून गायी, म्हशी आणि रेडा यांचे पूजन करतात. पशुधन गवळी समाजाच्या उदरनिर्वाहाचे साधन असले तरी गाय आणि म्हैस लक्ष्मीचे स्वरूप असून, यमराजाचे वाहन रेडा यांचे पाडव्यानिमित्त पूजन करतात.