ST news । राज्यातील एसटीची बससेवा पुर्ववत सुरु

ST news । पुणे : मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान राज्यात ठिक-ठिकानी बसेसची तोडफोड व जाळपोळ करण्यात आली. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात (Marathwada, Vidarbha) जाणाऱ्या संपूर्ण बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. परंतु आता आंदोलन मागे घेतल्यामुळे बससेवा (ST news) पुर्ववत सुरु करण्यात आली आहे. (ST bus services in the state have already started)

 

 

ऐन दिवाळीच्या (Diwali 2023) तोंडावर एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटीच्या सर्व (ST Mahamandal) आगारातून वाहतूक सेवा सुरळीत झाल्या आहेत. मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान (Maratha Reservation Protest) अनेक ठिकाणी एसटी बसला लक्ष्य करण्यात आले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून अनेक एसटी फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या.

 

 

सध्या राज्यभरात शालेय विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा (Half term examination of school students) सुरु असल्याने शालेय फेऱ्यांना एसटीकडून प्राधान्य देण्यात आले आहे. तर येत्या 9 नोव्हेंबरपासून एसटीची दिवाळीनिमित्ताने फेऱ्या वाढविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

 

Tehsil Office in Loni Kalbhor । लोणी काळभोरमध्ये अपर तहसील कार्यालयाला मंजुरी

सणासुदीला गर्दीचा फायदा घेत खासगी बसचालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे उकळले जाते. दिवाळीमध्ये (Diwali) बसेसअभावी प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटीच्या बसेस सोडण्यात येणार आहेत.

 

Local ad 1