...

Tehsil Office in Loni Kalbhor । लोणी काळभोरमध्ये अपर तहसील कार्यालयाला मंजुरी

Tehsil Office in Loni Kalbhor । पुणे : शहरीकरण वेगाने होत असलेल्या हवेली तालुक्‍याचे महसुली विभाजन करण्यास शासनाने गुरुवारी मान्यता दिली आहे. त्यानुसार लोणी काळभोर येथे आणखी एक अपर तहसिल (Tehsildar) कार्यालय स्थापन होणार आहे. शासन दरबारी 2015 पासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. आज अखेर हा प्रस्तावास शासनाने मान्यता दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे हवेली तालुक्‍यातील नागरिकांची कामे वेळेत होण्यास मदत होणार आहे. (Approval of Upper Tehsil Office in Loni Kalbhor)

 

 

हवेली तालुक्‍यात कामाचा व्याप वाढत असल्याने प्रलंबित कामांची संख्या मोठी आहे. कामे वेळेत आणि वेगाने होण्यासाठी पूर्व आणि पश्‍चिम हवेली असे दोन तालुके निर्माण करायचे अथवा हवेली तालुक्‍यात दोन अपर तहसीलदार नेमायचे, असा प्रस्ताव 2015 मध्ये शासनाकडे पाठविला होता. मात्र, त्यावर निर्णय होत नव्हता. दरम्यान हवेली तहसिलचे विभाजन दोन -तीन महिन्यात करण्यात येणार असल्याची घोषणा डिसेंबर 2022 मध्ये महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती.

 

पुणे जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात हवेली तालुक्‍याचा विस्तार आहे. तालुक्‍यातील काही गावांचा समावेश पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांमध्ये होतो. चारही बाजूंनी तालुक्‍याचा विस्तार वेगाने होत आहे. तालुक्‍याची लोकसंख्या सुमारे 28 लाख आहे. नागरीकरण मोठ्या प्रमाणावर असल्याने उद्योग, व्यवसाय वेगाने वाढत आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यात महसूल विभागावर कामाचा व्याप वाढत आहे. यापूर्वी 2011 मध्ये हवेली महसुल विभाजन होऊन पिंपरी -चिंचवड साठी स्वतंत्र अप्पर तहसिलदार हे पद निर्माण करून पिंपरी चिंचवड शहरातच कार्यालय स्थापन करण्यात आले. यामुळे या परिसरातील नागरिकांची सोय झाली. तसेच त्यांना पुणे शहरात येण्याचा त्रास वाचला.

 

आता शासनाने लोणी काळभोर येथे अपर तहसिल कार्यालय स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. याचसह या कार्यालयासाठी अपर तहसिलदार आणि महसुल सहायक अशी दोन पदे सुध्दा मंजुर केली आहे. याबाबतचा शासन निर्णय महसुल विभागाचे उपसचिव संतोष गावडे यांनी जारी केला आहे.

 

असे असणार कार्यक्षेत्र

तहसिलदार हवेली (haveli Tehsildar) – खडकवासला, कोथरुड, हडपसर, खेडशिवापूर, कळस – 86 गावे
अपर तहसीलदार लोणी काळभोर – वाघोली, उरुळीकांचन, थेऊर – 44 गावे

 

Local ad 1